Curry Leaves : कढीपत्ता आहे केसांसाठी वरदान, या गोष्टी मिसळून लावा पेस्ट, केस होतील लांबलचक

Last Updated:

महागड्या आणि रासायनिक उपचारांऐवजी नैसर्गिक पद्धतीनं केस लांब, मजबूत करता येतात. केसांची लांबी आणि सौंदर्य वाढवण्यासाठी कढीपत्ता हा एक प्रभावी घरगुती उपाय आहे.

News18
News18
मुंबई : तुम्हाला केसगळतीचं टेन्शन येत असेल तर त्यासाठी एक घरगुती उपाय....महागड्या आणि रासायनिक उपचारांऐवजी नैसर्गिक पद्धतीनं केस लांब, मजबूत करता येतात. केसांची लांबी आणि सौंदर्य वाढवण्यासाठी कढीपत्ता एक प्रभावी घरगुती उपाय आहे. त्यात प्रथिनं, अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वं असतात, यामुळे केसांच्या मुळांचं पोषण होतं आणि केसांची वाढ वेगानं होते.
कढीपत्ता केसांसाठी उपयुक्त आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यासोबत आणखी काही जिन्नस मिसळून केसांना लावणं उपयुक्त ठरतं. पाहूयात यासाठीचे काही पर्याय
1. कढीपत्ता आणि खोबरेल तेलाचं मिश्रण -
खोबरेल तेलात कढीपत्ता मिसळून केसांना लावल्यानं केस गळणं कमी होतं आणि त्यांची वाढ वेगानं होते. एक वाटी खोबरेल तेल घ्या आणि त्यात 10-15 कढीपत्त्याची ताजी पानं घाला. पानांचा रंग काळा होईपर्यंत मंद आचेवर ५-७ मिनिटं उकळा. तेल थंड करा आणि तेल केसांच्या मुळांमध्ये जाईल असा मसाज करा. 1-2 तास हे मिश्रण केसांमध्ये राहू द्या आणि नंतर सौम्य शैम्पूनं धुवा.
advertisement
2. कढीपत्ता आणि मेथीची पेस्ट -
मेथी दाणे हा देखील केसांची लांबी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. कढीपत्ता आणि मेथीची पेस्टमुळे केसांच्या मुळांना पोषण मिळतं. २ टेबलस्पून मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी कढीपत्ता बारीक करुन त्यात भिजवलेली मेथी घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट टाळूवर लावा आणि 30-40 मिनिटांनी धुवा.
advertisement
3. कढीपत्ता आणि कोरफड जेल -
कोरफडीमुळे केसांसाठी आवश्यक आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत होते आणि केसांची वाढ वेगानं होते. थोडा कढीपत्ता घेऊन त्याची पेस्ट बनवा. त्यात २-३ टेबलस्पून कोरफडीचा गर घाला. केसांच्या मुळांवर लावा आणि 1 तासानंतर धुवा.
advertisement
4. कढीपत्ता आणि दही मास्क -
दही आणि कढीपत्त्याच्या मास्कमुळे केस चमकदार आणि मुलायम होतात. कोरड्या टाळूसाठीही हे उपयुक्त आहे. कढीपत्त्याची 10-12 बारीक पानं दह्यात मिसळा. ही पेस्ट केसांना लावा आणि 20-30 मिनिटांनी सौम्य शॅम्पूनं धुवा.
5. कढीपत्ता आणि कांद्याचा रस -
केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस गुणकारी आहे. कढीपत्त्याच्या पानांसोबत हा रस लावल्यानं केस मजबूत आणि लांब होतात. कढीपत्ता बारीक करुन कांद्याच्या रसात मिसळा. हे मिश्रण केसांना लावा आणि 30 मिनिटांनी केस धुवा. यामुळे केसांना आवश्यक जीवनसत्त्वं आणि खनिजं मिळतात. टाळूमध्ये होणारं रक्ताभिसरण सुधारतं.
advertisement
केस अकाली पांढरं होण्यास यामुळे आळा बसतो. यामुळे केस जाड आणि मजबूत होतात.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Curry Leaves : कढीपत्ता आहे केसांसाठी वरदान, या गोष्टी मिसळून लावा पेस्ट, केस होतील लांबलचक
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement