डोकेदुखी आणि थकव्याला हलक्यात घेऊ नका, गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सामान्य सर्दी-खोकला ठरू शकतो घातक; असू शकतात 'या' गंभीर आजाराची लक्षणं
हिवाळा सुरू होऊन महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. मात्र, वातावरणात अपेक्षित चांगले बदल झालेले नाहीत. देशातील बहुतांश भागांमध्ये दिवसभरात तिन्ही ऋतुंचा अनुभव येत आहे. सकाळच्या वेळी वातावरणात गारवा जाणवत आहे तर दुपारी ऊन आणि अंशत: ढगाळ वातावरण दिसत आहे. यामुळे अनेकजण आजारी पडत असून दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. या रुग्णसंख्येमध्ये न्यूमोनियाचे रुग्ण देखील मोठ्या प्रमाणात आहेत. न्यूमोनिया हा फुफ्फुसाचा संसर्ग आहे. न्यूमोनिया झाल्यानंतर कफ, खोकला, ताप, थंडी वाजून येणं आणि श्वास घेण्यास त्रास होणं, यांसारख्या समस्या जाणवतात. न्यूमोनियाची तीव्रता सौम्य ते प्राणघातक असू शकते. त्यामुळे त्याची कारणं, लक्षणं, प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचारांबद्दल माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. 'एनडीटीव्ही'ने या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
न्यूमोनियासारखा गंभीर आजार व्हायरस, बॅक्टेरिया, फंगस किंवा इतर जीवांमुळे होऊ शकतो. नवजात बालकं, लहान मुलं, 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक आणि कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींना न्यूमोनिया झाल्यास त्यांची स्थिती गंभीर होऊ शकते. काहीवेळा न्यूमोनियामुळे व्यक्तींचा मृत्यूदेखील होऊ शकतो.
न्यूमोनियाची लक्षणं
- श्वास घेताना किंवा खोकताना छातीत दुखणं.
- 65 आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींचा गोंधळ उडतो.
advertisement
- कफ असलेला खोकला येणं.
- थकवा येणं, ताप येणं, घाम येणं किंवा थंडी वाजूणं.
- शरीराचं तापमान सामान्यपेक्षा कमी (65 वर्षांवरील आणि कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये ही समस्या जाणवते)
- मळमळ, उलट्या किंवा जुलाब होणं.
न्यूमोनियापासून बचाव कसा करावा?
1) न्यूमोकोकल आणि फ्लूची लस ही न्यूमोनियासारख्या गंभीर आजारांना रोखण्यासाठी प्रभावी ठरू शकते. हात नियमितपणे साबणाने धुतल्यास जंतूंचा प्रादुर्भाव रोखता येतो.
advertisement
2) तुम्ही सिगरेट ओढत असाल तर ते टाळावं. कारण, सिगरेटमुळे फुफ्फुसं आणि प्रतिकारशक्ती कमकुवत होते.
3) न्यूमोनिया टाळण्यासाठी, फळं, भाज्या आणि लीन प्रोटिनने समृद्ध असलेला संतुलित आहार घेणं आणि पुरेशी झोप घेणे महत्त्वाचं आहे.
4) खोकताना आणि शिंकताना नाक व तोंड झाकावं. संसर्ग झालेल्या रुग्णांपासून दूर राहावं जेणेकरून त्यांचा संसर्ग तुम्हाला होऊन तुम्ही आजारी पडणार नाही.
advertisement
वरील गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्ही न्यूमोनियासारख्या आजारापासून स्वत:चा बचाव करू शकता आणि तुम्ही आरोग्यवान राहू शकता
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2024 2:57 PM IST