How to Drink Water: उभं राहून पाणी प्यायल्याने गुडघे दुखतात?

Last Updated:

दिवसातून 3 लीटर पाणी पिण्याचा सल्ला सल्ला तज्ज्ञ देत जरी असले तरीही तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने पाणी पित असाल तर ते तुमच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं.

प्रतिकात्मक फोटो - उभं राहून पाणी का पिऊ नये ?
प्रतिकात्मक फोटो - उभं राहून पाणी का पिऊ नये ?
मुंबई : हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आपण जुन्या सगळ्या मूलभूत गोष्टी विसरून गेलो आहोत. एकीकडे जंक फूडमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत असताना दुसरीकडे चुकीच्या ‘खाण्यापिण्या’च्या सवयींमुळे आजारांना नकळत निमंत्रण दिलं जातंय. इथे खाणे-पिणे या शब्दाचा उपयोग मुद्दामून केला गेलाय कारण अगदी चुकीच्या पद्धतीने पाणी पिण्याची सवय तुमच्या गुडगेदुखीचं कारण ठरू शकते. ऐकून खोटं वाटेल पण हे खरं आहे.
घाईत जेवण करणे, गटागट पाणी पिणे हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानीकारक असते. दिवसातून 3 लीटर पाणी पिण्याचा सल्ला सल्ला तज्ज्ञ देत जरी असले तरीही तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने पाणी पित असाल तर ते तुमच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं. कारण आपण पाणी कसे पितो हे ? देखील तितकंच महत्त्वाचे आहे. बहुतेक लोक उभे राहून पाणी पितात. तज्ज्ञांच्या मते उभं राहून पाणी प्यायल्याने  गुडघ्यांवर वाईट परिणाम होतो आणि गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो.
advertisement
उभं राहून पाणी प्यायल्याने नेमकं काय होतं ?
आपण जे काही खातो किंवा पितो ते सर्व आपल्या अन्ननलिकेद्वारे आपल्या पोटात जाते. त्यानंतर मग आपल्या आतड्यांपर्यंत पोहोचते आणि तिथे ते शोषले जाते. उभं राहून पाणी प्यायल्यामुळे निश्चितपणे काही समस्या उद्भवू शकतात. उभं राहून पाणी प्यायल्याने ते शरीरात लवकर शोषलं जाते. जे सांध्यां धोकादायक आहे. दीर्घकाळ अशाच पद्धतीने पाणी पिणं सुरू ठेवल्यास  केल्यास सांधेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात. उभं राहून पाणी प्यायल्यामुळे ते थेट पोटाच्या खालच्या भागात पोहोचते. ज्यामुळे किडनीवर दाब पडतो. यामुळे किडनीशी संबंधित आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उभे राहून पाणी पिऊ नये. असा सल्ला डॉक्टर देतात
advertisement
या गोष्टी लक्षात ठेवा
शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्यायची गरज आहे. रोज 4 ते 5 लिटर पाणी पिणे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचं आहे. पाणी फार कमी किंवा फारच जास्त प्रमाणात पिऊ नये. हे दोन्ही आरोग्यासाठी हानिकारक आहेत. पाणी नेहमी आरामात बसून प्यावं. हळूहळू एक एक घोट पाणी प्यावं. जेवणाच्या अर्धा तास आधी आणि अर्धा तास नंतर पाणी पिणं केव्हाही चांगलं. सकाळी रिकाम्या पोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी पिणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे.ज्यामुळे फॅट्स बर्न व्हायला मदत होऊन वजन नियंत्रणात राहायला मदत होते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
How to Drink Water: उभं राहून पाणी प्यायल्याने गुडघे दुखतात?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement