वाढत्या वजनानं त्रस्त असाल आणि ते कमी करण्याचा सोपा पण प्रभावी मार्ग शोधत असाल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. यावर आहारतज्ज्ञ साक्षी लालवाणी यांनी इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आणि पोटाची चरबी कमी करण्याचा सोपा मार्ग सांगितला .
Gastric Headache : गॅसमुळे वाढते डोकेदुखी, कसं ठेवाल नियंत्रण ? या नैसर्गिक उपायांची होईल मदत
advertisement
चरबी कमी करणं सोपं नाही पण जर दिवसाची सुरुवात योग्य सवयींनी केली तर ती निश्चितच ही प्रक्रिया जलद करण्यास मदत करू शकते. विशेषतः सकाळी केलेले चार बदल शरीरातील वाढती चरबी जाळण्यासाठी प्रभावी ठरू शकतात.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी सकाळी या चार गोष्टी करा
1 - देशी तूप आणि आवळा पावडर
यासाठी आहारतज्ज्ञ साक्षी यांनी, सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी पाव चमचा आवळा पावडर एक चमचा देशी गाईच्या तुपात मिसळून खाण्याचा सल्ला दिला आहे. आवळा पावडर नुसती खाऊ शकता किंवा कोमट पाण्यासोबत घेऊ शकता. तुपामुळे यकृतातला पित्त प्रवाह सुधारतो, ज्यामुळे चरबीचं पचन जलद होतं. आवळा यकृताच्या डिटॉक्सला मदत करतो. या सर्वांव्यतिरिक्त, या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्यानं हार्मोन्स संतुलित होतात, ज्यामुळे वजन देखील नियंत्रणात राहतं. यासाठी, सकाळी उठल्यानंतर दहा मिनिटांच्या आत देशी तूप आणि आवळा पावडर खाण्याची शिफारस करतात. त्यानंतर, 15-20 मिनिटं दुसरं काहीही खाऊ नका असा सल्लाही देतात.
2- थंड पाण्यात चेहरा धुणे किंवा बुडवणे.
सकाळी उठल्यानंतर फक्त थंड पाण्यानं चेहरा धुणं किंवा थंड पाण्यात 15 ते 30 सेकंद चेहरा बुडवून ठेवल्यानं चरबी जाळण्यास मदत होऊ शकते. साक्षी यांच्या मते, बर्फाच्या पाण्यात चेहरा धुणं किंवा बुडवण्यानं शरीरातील ब्राऊन फॅट सक्रिय होतं. ब्राऊन फॅट शरीराला उबदार ठेवण्यासाठी पांढऱ्या चरबीला जाळते, ज्यामुळे चरबी जलद जळते. यामुळे चयापचयाचा वेग वाढतो आणि शरीर अधिक ऊर्जा खर्च करतं.
3 - 3- 3 मिनिटं श्वास घेण्याचा व्यायाम
'अनुलोम-विलोम' किंवा 'बॉक्स ब्रीदिंग' केल्याचेही शरीराला अनेक फायदे आहेत. यामुळे कॉर्टिसोलची पातळी कमी होते, ज्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते. या सर्वांव्यतिरिक्त, श्वास घेण्याचे व्यायाम केल्याने पचन आणि आतड्यांचे आरोग्य देखील सुधारते.
Paschimottansana : वाढत्या वयात योगाभ्यासाचा आधार, पश्चिमोत्तानासानानं अनेक समस्या होतील कमी
4- दहा मिनिटं हलकी शारीरिक हालचाल
या सर्वांव्यतिरिक्त, पोषणतज्ज्ञ सकाळी रिकाम्या पोटी दहा मिनिटं योगा, स्ट्रेचिंग किंवा चालणं यासारखे हलके व्यायाम करण्याची शिफारस करतात.
साक्षी लालवाणी यांच्या मते, सकाळी केलेल्या शारीरिक हालचालींमुळे AMPK नावाचं एंजाइम सक्रिय होतं, यामुळे शरीरातील चरबी जळण्यासाठी ऊर्जा मिळते. याशिवाय, सकाळी केलेल्या शारीरिक हालचालींमुळे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते, ज्यामुळे चरबीचा साठा कमी होतो, तसेच दिवसभर ऊर्जा टिकून राहते, त्यामुळे जास्त जेवण जात नाही. तुमच्या तब्येतीला अनुसरुन डॉक्टरांच्या सल्ल्यानंच दिनचर्येत बदल करणं उचित ठरेल.