चंदनामध्ये दाहक-विरोधी आणि त्वचा उजळवणारे गुणधर्म असतात, यामुळे टॅनिंग कमी होतं, आणि त्वचा नैसर्गिकरित्या उजळते. यासाठी चंदनासोबत आणखी काही नैसर्गिक घटक मिसळल्यानं त्वचा चमकदार दिसते.
Immunity : नवतापात कशी वाढवाल रोगप्रतिकारशक्ती ? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
चमकदार त्वचेसाठी घरगुती फेस पॅक
1. चंदन, हळद, दह्याचा फेस पॅक
चंदन पावडरमध्ये चिमूटभर हळद, दही आणि गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा. ते 15-20 मिनिटं चेहऱ्यावर लावा आणि नंतर स्वच्छ पाण्यानं धुवा. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते.
advertisement
2. चंदन आणि कोरफड
कोरफडीच्या ताज्या जेलमधे एक चमचा चंदन पावडर मिसळा आणि ते लावा. टॅनिंग दूर करण्यासोबतच, कोरफड त्वचेला थंडावा देण्यास देखील मदत करते. ही पेस्ट त्वचेला हायड्रेट करते आणि ती निरोगी बनवते.
3. चंदन आणि दूध
कच्च्या दुधात चंदन मिसळून पातळ पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. दूध नैसर्गिकरित्या त्वचेला एक्सफोलिएट करते आणि स्वच्छ करते. नियमित वापरानं त्वचा मऊ आणि चमकदार दिसेल.
Digestion : पोटाच्या आरोग्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला, नैसर्गिक उपाय ठरतील उपयुक्त
4.चंदन आणि दही
दह्यात चंदन मिसळून लावल्यानं त्वचेच्या मृत पेशी निघून जातात आणि टॅनिंग हळूहळू कमी होते. दह्यात असलेलं लॅक्टिक एसिड त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करते.
5.चंदन आणि गुलाबजल
चंदन पावडर गुलाबपाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. गुलाबपाण्यानं त्वचा फ्रेश वाटते आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.
या घरगुती उपायांचा अवलंब करून कोणत्याही रसायनांशिवाय त्वचेवरचं टॅनिंग दूर होतं. या नैसर्गिक घटकांचा नियमित वापर केल्यानं त्वचा स्वच्छ, निरोगी आणि चमकदार राहील.
