TRENDING:

Summer Care: उन्हाळ्यात होणारी पायांची जळजळ कमी करण्यासाठी उपाय, पाय थंड राहण्यासाठी होईल उपयोग

Last Updated:

उन्हाळ्यात पायांच्या तळव्यांना खूप जळजळ होऊ शकते. ही समस्या तुम्हालाही जाणवत असेल तर, नैसर्गिक उपाय वापरून ही समस्या कमी होऊ शकते. पायांच्या तळव्यांमध्ये होणारी जळजळ कमी करण्यासाठी, निलगिरी, पुदिना आणि खोबरेल तेलानं मालिश, थंड पाण्यात पाय बुडवणं, भिंतीला पाय ठेवून झोपणं आणि चंदन पावडरचा लेप लावणं या उपायांमुळे पायांना थंडावा आणि आराम मिळतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: उन्हाळ्यात पायांच्या तळव्यांना खूप जळजळ होऊ शकते. ही समस्या तुम्हालाही जाणवत असेल तर, नैसर्गिक उपाय वापरून ही समस्या कमी होऊ शकते.
News18
News18
advertisement

पायांच्या तळव्यांमध्ये होणारी जळजळ कमी करण्यासाठी, निलगिरी, पुदिना आणि खोबरेल तेलानं मालिश, थंड पाण्यात पाय बुडवणं, भिंतीला पाय ठेवून झोपणं आणि चंदन पावडरचा लेप लावणं या उपायांमुळे पायांना थंडावा आणि आराम मिळतो.

पायांच्या तळव्यांमध्ये जळजळ होण्याची समस्या उन्हाळ्यात वाढते. ही समस्या वृद्धांमध्ये दिसून येते, परंतु सध्या  ही समस्या तरुणांमध्येही दिसून येते. या जळजळीमागील मुख्य कारण व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता, डायबेटिक न्युरोपॅथी यासारख्या समस्या असू शकतात.

advertisement

Summer Drink : उन्हाच्या तलखीतून वाचण्यासाठी हे पर्यायही लक्षात ठेवा, पारंपरिक उपायांचा होईल उपयोग

1. निलगिरीच्या तेलानं पायांना मसाज - निलगिरीच्या तेलानं पायांना मसाज करणं हा पायाची जळजळ आणि वेदना कमी करण्याचा एक चांगला मार्ग आहे. निलगिरी तेलामध्ये थंडावा देणारे गुणधर्म आहेत आणि त्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे वेदना त्वरित कमी होऊ शकतात. याशिवाय, यामुळे नसांनाही आराम मिळतो.

advertisement

2. तळव्यांवर पुदिन्याचं तेल लावा - तळव्यांवर पुदिना तेल लावल्यानं खूप आराम मिळू शकतो. पुदिना तेलामुळे थंडावा मिळतो आणि नसांनाही यामुळे आराम मिळतो आणि जळजळ कमी होते. तसंच या तेलामुळे, लवकर  आणि चांगली झोप येण्यास मदत होऊ शकते.

3. नारळ तेल - नारळ तेलामुळे पायांची जळजळ कमी होऊन थंडावा मिळतो. बहुतेकदा शरीराच्या मालिशसाठी नारळाचं तेल वापरलं जातं. तळवे उष्णतेमुळे जळजळत असतील तर खोबरेल तेल लावल्यानं खूप आराम मिळू शकतो. रात्री झोपण्यापूर्वी तळव्यावर खोबरेल तेल लावल्यानं जळजळ कमी होते तसंच त्वचेशी संबंधित समस्याही कमी होतात. शरीरालाही थंडावा मिळतो.

advertisement

4. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर: कोमट पाण्यात अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मिसळून त्यात पाय भिजवल्यानं पायाला होणारी जळजळ कमी होते. या प्रक्रियेमुळे तळव्यांच्या त्वचेची छिद्र उघडतात आणि वेदना आणि सूज दूर कमी होते. रक्ताभिसरण सुधारतं, ज्यामुळे जळजळ कमी होते.

Summer Drink : उन्हाळ्यासाठी गुणकारी नैसर्गिक पेय, वाचा कोरफडीच्या सरबताचे आरोग्यदायी फायदे

advertisement

5. थंड पाण्यात 15 मिनिटं पाय बुडवा: थंड पाण्यात किमान 15 मिनिटं पाय बुडवल्यानं त्वरित आराम मिळू शकतो. अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता किंवा शरीराच्या जास्त उष्णतेमुळे, पायांच्या तळव्यांमध्ये जळजळ होऊ शकते. त्यामुळे, पाय थंड पाण्यात ठेवल्यानं जळजळ होण्यापासून त्वरित आराम मिळू शकतो.

6. भिंतीला पाय लावून झोपा: भिंतीला पाय ठेवून झोपणं हा योगासनांतला एक प्रकार आहे. यामुळे पायांमध्ये वाढलेला रक्तदाब कमी होतो, ज्यामुळे वेदना आणि जळजळ कमी होते. तसंच, या स्थितीत झोपल्यानं रक्ताभिसरण सुधारतं, ज्यामुळे पायांमध्ये जळजळ कमी होते.

7. चंदन पावडर लेप: उष्णतेमुळे तळवे जळजळत असतील तर चंदन पावडर वापरणं हा एक उत्तम उपाय असू शकतो. यासाठी थोडी चंदन पावडर घ्या आणि त्यात गुलाबपाणी किंवा साधं पाणी घाला आणि गुळगुळीत लेप तयार करा. हा लेप तळव्यांवर व्यवस्थित लावा आणि सुमारे 30 मिनिटं तसंच राहू द्या. लेप सुकल्यावर थंड पाण्यानं पाय धुवा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Care: उन्हाळ्यात होणारी पायांची जळजळ कमी करण्यासाठी उपाय, पाय थंड राहण्यासाठी होईल उपयोग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल