खरगोन - दूध हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. डॉक्टरही दूध पिण्याचा सल्ला देतात. मात्र, गाय की म्हैस दोघांपैकी कुणाचे दूध जास्त चांगले असते, यावर कायम चर्चा होत असते. मात्र, अनेकांना माहिती नसेल. गाय आणि म्हशीच्या तुलनेत बकरीचे दूध हे जास्त चांगले मानले जाते. या दुधाचे नेमके काय फायदे आहेत, हेच जाणून घेऊयात.
advertisement
बकरीच्या दुधात कॅल्शियम, प्रोटीनसारखे पोषक तत्त्वे जास्त प्रमाणात आढळतात. फॅटचे प्रमाण कमी असते. यामुळे त्याला पचवणे सोपे आहे. विशेष म्हणजे हे दूध अनेक आजारांवरही फायदेशीर आहे. बकरीच्या दुधाचे फायदे काय आहेत याबाबत खरगोनच्या शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयातील पशुवैद्यकीय सहाय्यक सर्जन डॉ. बी. एल. पटेल यांनी महत्त्वाची माहिती दिली.
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, बकरीचे दूध हे जास्त फायदेशीर आहे. मात्र, त्याचे प्रमाण कमी असल्याने ते बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे लोक गाय आणि म्हशीच्या दूधाचा उपयोग करतात. जर बकरीच्या दुधाचे प्रमाण जास्त झाले तर लोक त्याचाच वापर करतील, असे ते म्हणाले.
बकरीच्या दुधात कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. कारण खनिज क्षार शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. गायीच्या दुधात 4 ते 5% फॅट असते. म्हशीच्या दुधात 7 ते 8% फॅट असते. तर बकरीच्या दुधात फक्त 3.5% फॅट असते आणि हे गायी आणि म्हशीच्या तुलनेत खूपच पातळ असते. तसेच ते सहज पचवताही येते.
बकरीचे दूध प्यायल्याने हृदयविकार, किडनी, मधुमेह, ऍलर्जी यांसारख्या समस्यांपासून खूप आराम मिळतो. इतकेच नव्हे तर या दुधामुळे शारीरिक रोगांशी लढण्याची क्षमताही वाढते, असे त्यांनी सांगितले.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राचीन काळापासूनच नवजात बालकांसाठी बकरीच्या दुधाचे सेवनाबाबत सांगितले जात आहे. आजही एखाद्या महिलेला प्रसुतीनंतर दूध कमी येत असेल किंवा बालकाचे पोषण नीट होत नसेल तर बकरीचे दूध पाजले जाते. बकरीचे दूध हे आईच्या दुधासमान मानले जाते. त्यामुळे नवजात शिशू हे सहज पचवते.
सूचना - ही माहिती तज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.