कोरोनाशी लढण्यासाठी काय करायचं याचं उत्तर प्रत्येकाला माहित आहे, कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं आता या सूचनांचं पालन करण्याची वेळ आली आहे, तरंच आपण कोरोनाला हरवू शकतो. कोरोनाशी लढण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणं महत्वाचं आहे. तसंच, कोरोनाचा संसर्ग पसरवणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणं आणि स्वतःचं रक्षण करणं गरजेचं आहे.
Sweating : घामाचा वास घालवण्यासाठी टिप्स, ऐका तज्ज्ञांचा सल्ला
advertisement
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी, नागरिकांना शक्य तितकं घरी राहण्याचा सल्ला दिला जातो, पण ज्यांना बाहेर पडणं अपरिहार्य त्यांच्यासाठी काही सूचनांची उजळणी -
- मास्क - कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी, फेस मास्क वापरणं महत्वाचं आहे. तोंड आणि नाक व्यवस्थित झाकलं जाईल अशा प्रकारे मास्क वापरा. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी मेडिकल मास्क किंवा एन-95 मास्क वापरा.
- पॉलिथिन बॅग - खाता- पिताना मास्क काढला तर तो तुमच्या बॅगेत किंवा जवळच्या टेबलावर टाकू किंवा ठेवू नका. काढलेला फेस मास्क प्लास्टिकच्या पॉलिथिन बॅगमध्ये ठेवा. फेकण्यापूर्वी मास्क पॅक करा. तो उघड्यावर फेकू नका.
Nose Bleeding : नाकातून रक्त का येतं ? एपिटक्सिस म्हणजे काय ? जाणून घ्या
- सॅनिटायझर - कोरोनापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी सॅनिटायझर वापरणं खूप महत्वाचं आहे. कोणत्याही पृष्ठभागाला स्पर्श करण्यापूर्वी आणि नंतर सॅनिटायझरनं हात स्वच्छ करा. हात धुतल्याशिवाय किंवा सॅनिटायझर न करता काहीही खाणं टाळा.
- टिशू पेपर - खोकला किंवा शिंक येत असेल तर तोंड झाकण्यासाठी टिशू पेपर सोबत ठेवा. हा टिशू पेपर वापरल्यानंतर, तो कुठेही फेकू नका तर बंद कचऱ्याच्या डब्यात टाका.
- पाण्याची बाटली, खाद्यपदार्थ सोबत ठेवा - ऑफिस ते घरी जाताना तहान किंवा भूक लागते. यासाठी, घरातून पाण्याची बाटली आणि नाश्ता सोबत ठेवावा. जेणेकरून बाहेरून काहीही खरेदी करावं लागणार नाही. बाहेरून कमी वस्तू खरेदी करणं फायदेशीर आहे. यामुळे थेट संपर्क टाळता येतो.