TRENDING:

Hair Loss : केसांचं आरोग्य जपायचं असेल तर आहारात बदल करा, अंतर्गत पोषणामुळे थांबेल केस गळती

Last Updated:

केस गळणं थांबवण्यासाठी आणि केसांची वाढ सुधारण्यासाठी चांगला आहार गरजेचा आहे. रोजच्या आहारात प्रथिनांचा समावेश केल्यानं केस गळती रोखता येऊ शकेल. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : केस गळण्यामुळे हैराण होत असाल तर ही माहिती नक्की वाचा. अनेकदा केसांवर बाहेरची उत्पादनं वापरली जातात, घरी उपायही केले जातात. केसांची योग्य काळजी घेतली तर केस गळणं थांबतं. केसांना आतून पोषण मिळणं जास्त गरजेचं आहे. प्रथिनांनी युक्त असलेल्या आहारामुळे केस गळती कमी होऊ शकेल.
News18
News18
advertisement

केस गळणं थांबवण्यासाठी आणि केसांची वाढ सुधारण्यासाठी चांगला आहार गरजेचा आहे. रोजच्या आहारात प्रथिनांचा समावेश केल्यानं केस गळती रोखता येऊ शकेल. 

अंडी

केसांसाठी अंडी खूप फायदेशीर ठरतात. अंड्यांमध्ये प्रथिनं आणि बायोटिन भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे केस मजबूत होतात. अंडी खाल्ल्यानं शरीरातील प्रथिनांची पूर्तता तर होतेच पण केस गळण्याचं प्रमाणही कमी होतं.

advertisement

Roasted Raisins : हिवाळ्यात खा भाजलेले बेदाणे, अनेक आजारांवर रामबाण उपाय

बिया

विविध प्रकारच्या बिया केसांसाठी फायदेशीर असतात. बिया खाल्ल्यानं शरीराला प्रथिनं, ओमेगा ३ फॅटी ॲसिड, अँटी-ऑक्सिडंट्स आणि झिंक म्हणजे जस्त हे घटक मिळतात. केसांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी विशेषतः भोपळ्याच्या बियांचा आहारात समावेश करता येऊ शकेल.

सोया चंक्स

सोयाबीनपासून बनवलेले सोया चंक्स हे लोह आणि प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत. केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. सोया चंक्समुळे केस गळणंही कमी होतं.

advertisement

मटार

केसांच्या आरोग्यासाठी मटारही उपयुक्त ठरतात. मटारमध्ये जीवनसत्त्वं, प्रथिनं आणि लोह हे घटक असतात, ज्यामुळे केस निरोगी राहतात आणि केस गळण्याचं प्रमाण कमी होतं.

Facial : घरीच करा गोल्डन फेशियल, सात दिवसांचं ब्युटी रुटीन फॉलो करा, चेहऱ्यावर येईल चमक

डाळी

विविध प्रकारच्या कडधान्यांचा अनेकदा अन्नामध्ये समावेश केला जातो. कडधान्य खाल्ल्यानं आपल्याला प्रथिनं, लोह आणि फॉलिक ॲसिड मिळतं. कडधान्यांचं सेवन केल्यानं केस गळणं आणि जास्त पातळ होणं यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

advertisement

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

दूध आणि दुग्धजन्य पदार्थातून शरीराला कॅल्शियमसह भरपूर प्रथिनंही मिळतात. साधं दूध पिण्याऐवजी त्यात सुका मेवा घालून खाता येईल.

बदाम

प्रथिनयुक्त बदाम खाल्ल्यानं केस निरोगी राहतात. बदाम देखील फायबर आणि व्हिटॅमिन ई चा चांगला स्रोत आहे. यामुळे टाळूला मॅग्नेशियम आणि मँगनीज देखील मिळतं.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Hair Loss : केसांचं आरोग्य जपायचं असेल तर आहारात बदल करा, अंतर्गत पोषणामुळे थांबेल केस गळती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल