TRENDING:

शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचे पॉवर हाऊस!, दुधापेक्षाही जास्त powerful, जाणून घ्या, फायदे

Last Updated:

डॉक्टर योगेंद्र यांनी पुढे सांगितले की, सोयाबीन जर योग्य प्रमाणात खाल्ले तर त्यामुळे वजनही कमी होऊ शकते. सोयाबीनमध्ये फायबर आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वजन कमी करायची इच्छा असलेल्यांसाठी ते फायदेशीर आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जितेंद्र बेनीवाल, प्रतिनिधी
शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचे पॉवर हाऊस
शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचे पॉवर हाऊस
advertisement

फरीदाबाद : शरीराला शक्तीशाली करण्यासाठी जीवनसत्त्वांसोबत प्रथिनेही आवश्यक असतात. कारण, प्रथिने खराब झालेल्या पेशींची दुरुस्ती करण्यास मदत करतात. कोरोनानंतर लवकर बरे होण्यासाठी आता प्रथिनेयुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे प्रथिने म्हणजे प्रोटीनसाठी तुम्ही तुमच्या आहारात सोयाबीनपासून बनवलेल्या गोष्टी खाऊ शकता. सोयाबीन आणि त्याच्या उत्पादनांमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आणि प्रथिने असतात. हा वनस्पती आधारित प्रथिनांचा स्त्रोत असून इतर प्रथिनांपेक्षा अधिक फायदेशीर आहे.

advertisement

शरीरातील प्रथिनांची कमतरता सोयाबीनने सहज पूर्ण होऊ शकते. सोयाबीनच्या सेवनाने हृदय निरोगी राहते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. डॉक्टर योगेंद्र यांच्याशी लोकल18 च्या टीमने संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, सोयाबीन प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. खनिजांव्यतिरिक्त, यामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन ए देखील आहेत. त्यामुळे सामान्य लोक तसेच जिममध्ये जाणारे लोक प्रोटीनच्या सेवनासाठी सोयाबीनला प्राधान्य देतात.

advertisement

सोयाबीनचा किती फायदा -

डॉक्टरांनी सांगितले की, प्रथिनांशिवाय सोयाबीनमध्ये फायबर, मिनरल्स आणि फायटोस्ट्रोजेन्स असतात. याशिवाय त्यात सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाणही कमी असते. यासोबतच सोयाबीनमध्ये कोलेस्टेरॉल किंवा लैक्टोज नसतात. त्यामुळे यादृष्टीनेही सोयाबीन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सोयाबीनमध्ये लोह, मँगनीज, फॉस्फरस, तांबे, पोटॅशियम, जस्त आणि सेलेनियम देखील भरपूर प्रमाणात असल्याने शरीराला त्यांचा चांगला फायदा होतो.

advertisement

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडून या महिलेला आलं आमंत्रण, चाय पे चर्चा करणार, कोण आहेत बुलबुल देवी?

वजनही कमी करते -

डॉक्टर योगेंद्र यांनी पुढे सांगितले की, सोयाबीन जर योग्य प्रमाणात खाल्ले तर त्यामुळे वजनही कमी होऊ शकते. सोयाबीनमध्ये फायबर आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वजन कमी करायची इच्छा असलेल्यांसाठी ते फायदेशीर आहे. ओमेगा-3 फॅटी ॲसिडची कमतरता पूर्ण करण्यासाठीसुद्धा सोयाबीन खाऊ शकतात.

advertisement

प्रथिनांचा शाकाहारी स्त्रोत -

डॉक्टर योगेंद्र यांनी सांगितले की, जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी सोयाबीनपासून बनवलेले पदार्थ हे प्रथिनांचे सर्वोत्तम स्त्रोत आहेत. शाकाहारी लोक सोयाबीनचे दूध, सोयाबीन तेल, सोयाबीनचे चंक्स, सोयाबीन पावडरचे आणि विविध माध्यमातून त्याचे सेवन करू शकतात.

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती ही तज्ञांशी झालेल्या संवादावर आधारित आहेत. हा वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच वापरावी. कोणत्याही वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही हानीसाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचे पॉवर हाऊस!, दुधापेक्षाही जास्त powerful, जाणून घ्या, फायदे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल