TRENDING:

पुणेकरांनो सावधान! GSB चा धोका वाढला, प्रशासनाने दिली महत्त्वाची माहिती

Last Updated:

GBS Systems: पुण्यात GBS नावाच्या आजारानं डोकं वर काढलंय. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण असून प्रशासनाने योग्य उपाययोजना करत असल्याचे स्पष्ट केलेय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्राची केदारी, प्रतिनिधी
advertisement

पुणे : धकाधकीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अनेकदा नवनवीन रोग व आजारांची साथ आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं. सध्या पुणे शहरात 'गुलियन बॅरी सिंड्रोम' म्हणजेच जीबीएस नावाच्या आजाराने डोकं वर काढलं आहे. एका महिलेला या आजाराची लागण झाल्यानंतर डॉक्टरांच्या एका पथकाने तिच्यावर यशस्वीपणे उपचार केल्यामुळे तिने या आजारावर मात केल्याचे वृत्त मध्यंतरी समोर आले होते. मात्र, आता पुण्यात या दुर्मीळ आजाराचे तब्बल 29 संशयित रुग्ण आढळल्याची माहिती समोर आले आहे. या विषयीची अधिक माहिती लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.

advertisement

‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे पुण्यात 29 रुग्ण हे आढळून आहेत. यामध्ये पुणे महानगर पालिकेच्या क्षेत्रात 5 रुग्ण तर 24 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. गेली दोन दिवसांपासून पुणे शहरातील काही भागांमध्ये गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराचे रुग्ण सापडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात योग्य उपाययोजना करत असल्याचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितलं. नागरीकांमध्ये GBS विषयी जनजागृती करणे गरजेचे असून आरोग्य केंद्रांमध्ये या आजाराच्या निदानासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध केले जात आहेत.

advertisement

सावधान! झोपण्यापूर्वी रिल्स पाहताय? होऊ शकतो गंभीर आजार, डॉक्टरांचा सल्ला

लक्षणे व उपाय

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
स्वतःवर विश्वास ठेवला अन् स्वप्न साकार झालं, शेतकऱ्याच्या मुलगा झाला DYSP, Video
सर्व पहा

या आजाराची वेगवेळी लक्षणे आहेत. यामध्ये हाता-पायाची ताकद कमी होते. बोलायला त्रास होतो. मुंग्या आल्यासारखं वाटतं. श्वास घ्यायला देखील त्रास होतो. दूषित पाणी आणि अन्न यामुळे हा आजार होत आहे. सध्या नांदेड सिटी भागात हे रुग्ण जास्त आढळून आले आहेत. हा आजार संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, मात्र दूषित पाण्यामुळे हा आजार होत आहे. त्यामुळे पाणी उकळूनच प्यावे. तसेच उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. महापालिका तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून टास्क फोर्सच्या माध्यमातून उपायोजना केल्या जात आहेत, असे देखील आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
पुणेकरांनो सावधान! GSB चा धोका वाढला, प्रशासनाने दिली महत्त्वाची माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल