TRENDING:

Heart Attack - केवळ छातीतच नाही तर पाय, पोटदुखीदेखील आहेत हृदयविकाराची लक्षणं, दुखण्याकडे दुर्लक्ष करु नका

Last Updated:

पोटदुखी, पायांचं दुखणं बराच काळ असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. ही लक्षणं हृदयविकाराचीही असू शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अनेकांच्या पोटात दुखतं तेव्हा बहुतेक लोक वेदना गॅसमुळे किंवा अन्य काही कारणानं होते असं मानतात आणि दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. तसाच प्रकार असतो पाय दुखण्याचा. प्रत्येकवेळी पाय दुखणं हृदयाशी संबंधित नसतं, पण काहीवेळा मज्जातंतूंमधल्या अडथळ्यांमुळे पाय दुखत असतात. ज्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. म्हणून, पोटातील आणि पोटऱ्यांच्या स्नायूंमध्ये होणाऱ्या वेदना समजून घेणं आणि त्याचं कारण शोधणं खूप महत्वाचं आहे. जेणेकरून हृदयाचं आरोग्य ठीक आहे की हृदयात काही समस्या आहे याचा अंदाज घेता येईल.
News18
News18
advertisement

Uric Acid - युरिक ॲसिड वाढलं असेल तर या 7 गोष्टींचं सेवन करू नका, वाढू शकते सूज आणि वेदना

पोटदुखी कधी गंभीर होऊ शकते ?

गॅसमुळे पोटदुखी होते असं समजून लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. तुम्ही खूप मसालेदार पदार्थ खाल्ले असतील किंवा अल्कोहोलचं सेवन केलं असेल तेव्हाही पोट दुखू शकतं. पण जेव्हा पोटाच्या वरच्या भागात वेदना होतात तेव्हा ते गांभीर्याने घेतलं पाहिजे. हृदयाच्या समस्येमुळे पोटाच्या वरच्या भागात वेदना होऊ शकतात. चालताना किंवा कोणत्याही हालचालीदरम्यान पोटात दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि हृदयाशी संबंधित चाचण्या करून घेणं चांगलं. कधीकधी पोटाच्या वरच्या भागात वेदना समजून घेणं आव्हानात्मक असतं. पण अनेकदा काम करताना वेदना होतात आणि विश्रांती घेतल्यावर पोटदुखी बरी होते. विशेषत: जेव्हा तुमचा आहार देखील नेहमीसारखा असेल आणि तेव्हाही दुखत असेल तर याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे.

advertisement

Pimple Acne - चेहऱ्यावर मुरुमांच्या खुणा दिसत असतील तर या 4 गोष्टी वापरून पहा, डाग होतील कमी

पाय दुखण्याकडे दुर्लक्ष करु नका

डॉक्टरांच्या मते, पाय दुखण्याचा सहसा हृदयाशी संबंध नसतो. पण मज्जातंतूंच्या अडथळ्यामुळे पायांवर परिणाम होतो. विशेषतः जर पायांच्या स्नायूमध्ये वेदना होत असेल तर ते धमनी अवरोधित झाल्यामुळे असू शकतं. दुखत असेल तर सहसा बसून किंवा विश्रांती घेतल्यानं ही वेदना निघून जाते. पण ज्यांना आराम करताना किंवा बसूनही ही वेदना जाणवते, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

advertisement

ही लक्षणं लक्षात ठेवा, यामधील कोणताही त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे नक्की जा, तब्येतीची काळजी घ्या.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Heart Attack - केवळ छातीतच नाही तर पाय, पोटदुखीदेखील आहेत हृदयविकाराची लक्षणं, दुखण्याकडे दुर्लक्ष करु नका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल