Pimple Acne - चेहऱ्यावर मुरुमांच्या खुणा दिसत असतील तर या 4 गोष्टी वापरून पहा, डाग होतील कमी

Last Updated:

चेहऱ्यावर दिसणारे फोड आणि पिंपल्सच्या खुणा कमी करण्यासाठी काही घरगुती वस्तूंचा चांगला परिणाम होतो. या गोष्टी वापरण्यासही सोप्या आहेत.

News18
News18
मुंबई : काही कारणांमुळे चेहऱ्यावर मुरुमं येतात, ती काही दिवसांनी कमी होणार असली तरी त्याचे व्रण बराच काळ जात नाहीत. अशावेळी चेहऱ्यावर दिसणारे फोड आणि पिंपल्सच्या खुणा कमी करण्यासाठी काही घरगुती वस्तूंचा चांगला परिणाम होतो. या गोष्टी वापरण्यासही सोप्या आहेत.
आपल्या त्वचेचं सौंदर्य टिकवण्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो, पण पिंपल्स दिसण्यापासून कोणी रोखू शकत नाही ? चेहऱ्यावर मुरुम काही दिवस दिसतात पण त्यांच्या खुणा त्वचेवर दीर्घकाळ राहतात. या डागांमुळे चेहऱ्याची चमक तर नाहीशी होतेच पण त्यामुळे चेहरा निस्तेज दिसू शकतो. पुढे दिलेले सर्व पर्याय हे स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे आहेत.
advertisement
मध -
त्वचेवर मधाचा वापर करून काळे डाग कमी करता येतात. मधात दाहक -विरोधी आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आहेत, त्यामुळे मुरुम आणि मुरुमांचे डागही कमी करण्यासाठी मध प्रभावी आहे. तुम्ही मध त्वचेवर लावू शकता आणि काही वेळानं धुवून टाकू शकता.
advertisement
कोरफड -
मुरुमांच्या डागांवर कोरफडीचा चांगला परिणाम होतो. कोरफड डागांवर घासून 20 ते 30 मिनिटं ठेवा आणि नंतर धुवा. कोरफडीचा गर रात्रभर त्वचेवरही ठेवता येतो.
मसूर फेस पॅक
डाग कमी करण्यासाठी मसुर डाळीचा फेस पॅक चेहऱ्यावर लावता येतो. हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला मसूर आणि दूध लागेल. सर्वप्रथम, मसूर रात्रभर भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बारीक करून पेस्ट तयार करा. आवश्यकतेनुसार दूध घालून फेस पॅक तयार करा. हा फेस पॅक 15 ते 20 मिनिटं चेहऱ्यावर लावला जाऊ शकतो आणि नंतर धुता येतो.
advertisement
बटाट्याचा रस
बटाट्याचा रस केवळ मुरुम किंवा मुरुमांमुळे होणारे डाग हलके करण्यासाठीच नाही तर डाग कमी करण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो. कच्चा बटाटा किसून त्याचा रस काढा आणि कापसाच्या साहाय्यानं चेहऱ्याला लावा. डाग हळूहळू कमी होऊ लागतात. हे तुम्ही आठवड्यातून 2 वेळा करु शकता. हा रस 15 मिनिटं चेहऱ्यावर लावल्यानंतरच परिणाम दिसून येतो.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Pimple Acne - चेहऱ्यावर मुरुमांच्या खुणा दिसत असतील तर या 4 गोष्टी वापरून पहा, डाग होतील कमी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement