Uric Acid - युरिक ॲसिड वाढलं असेल तर या 7 गोष्टींचं सेवन करू नका, वाढू शकते सूज आणि वेदना
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
शरीरातील यूरिक ऍसिड जेव्हा वाढतं तेव्हा काही बदल नक्की करा. विशिष्ट प्रकारच्या पदार्थांचं सेवन टाळणं तुमच्या तब्येतीसाठी अशावेळी आवश्यक आहे.
Health tips : शरीरातील यूरिक ऍसिड जेव्हा वाढतं तेव्हा काही बदल नक्की करा. ज्यामुळे शरीरातील प्युरीनची पातळी वाढते अशा विशिष्ट प्रकारच्या पदार्थांचं सेवन टाळणं तुमच्या तब्येतीसाठी अशावेळी आवश्यक आहे. यूरिक ऍसिड हा शरीरातील प्युरीनच्या विघटनानं तयार होणारा एक प्रकारचा टाकाऊ पदार्थ आहे. प्युरिन हे नैसर्गिक रसायन आहे, जे अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये आढळतं. युरिक ऍसिड रक्तात विरघळतं आणि मूत्रपिंडांद्वारे शरीरातून बाहेर टाकलं जातं. पण जेव्हा याचं शरीरातील प्रमाण खूप वाढतं तेव्हा ते सांध्यांमध्ये जमा होऊन गाउट किंवा संधिवातासारखे आजार होऊ शकतात. म्हणूनच काही पदार्थ टाळावेत..
यूरिक ऍसिड वाढल्यावर कोणत्या गोष्टी टाळाव्यात पाहूयात
1. मांस आणि सीफूड -
जास्त यूरिक ऍसिड असलेल्या व्यक्तींनी लाल मांस, डुकराचं मांस आणि कोळंबी, खेकडा, ऑयस्टर, मॅकरेल, सार्डिन यांसारखे समुद्री पदार्थ टाळावेत. या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात प्युरीन असते, ज्यामुळे यूरिक ऍसिडची पातळी वाढू शकते.
advertisement
2. दारू -
अल्कोहोल आणि विशेषत: बिअरमध्ये प्युरीन्स मोठ्या प्रमाणात आढळतात, ज्यामुळे यूरिक ऍसिडची निर्मिती वाढू शकते. याव्यतिरिक्त, अल्कोहोल पिण्यामुळे मूत्रपिंडाच्या कार्यावर देखील परिणाम होतो. त्यामुळे युरिक ॲसिडची समस्या असल्यास दारूचं सेवन अजिबात करू नये.
3 साखरयुक्त पेय -
सॉफ्ट ड्रिंक्स आणि पॅक केलेले ज्यूस यांसारख्या गोड गोष्टी पिणं टाळावं, कारण यामध्ये फ्रक्टोज आणि साखर भरपूर असते. फ्रक्टोजचे जास्त सेवन केल्यानं शरीरात यूरिक ऍसिड तयार होण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे साखरयुक्त पदार्थ आणि मिठाईपासून दूर राहणं फायदेशीर ठरू शकतं.
advertisement
4 - जास्त प्रथिनयुक्त पदार्थ खाऊ नका
हरभरा, सोयाबीन, कडधान्यं आणि सोयाबीन यांसारखी प्रथिनं जास्त असलेले अन्नपदार्थही कमी प्रमाणात घ्यावेत. यामध्ये प्रथिनांचं प्रमाण चांगलं असलं तरी ते काही लोकांमध्ये यूरिक ऍसिडची पातळी वाढवू शकतं. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच प्रोटीनचं म्हणजे प्रथिनं असलेल्या पदार्थांचं सेवन करा.
advertisement
5 - फास्ट फूड आणि प्रक्रिया केलेले अन्न खाणं टाळावं
फास्ट फूड आणि प्रोसेस्ड फूडमध्ये प्रिझर्वेटिव्ह आणि कृत्रिम घटक असतात, ज्यामुळे पचन प्रक्रियेवर परिणाम होतो आणि शरीरात यूरिक ऍसिडची पातळी वाढते. याव्यतिरिक्त, या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट देखील असतं, जे किडनीच्या कार्यामध्ये व्यत्यय आणू शकतात.
6 - मशरूम आणि पालक
advertisement
मशरूम आणि पालक यांसारख्या भाज्यांमध्येही जास्त प्रमाणात प्युरीन असतं, हे खाल्ल्यानं युरिक ऍसिडची पातळी वाढू शकते. या भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्या तरी युरिक ॲसिडच्या रुग्णांनी या भाज्या कमी प्रमाणात खाव्यात.
7 - दुग्धजन्य पदार्थ
दुग्धजन्य पदार्थ जसं की दूध, चीज, मलई आणि लोणी यामध्ये saturated fat असतात, ज्यामुळे यूरिक ऍसिडची पातळी वाढू शकते. यावर कमी चरबीयुक्त किंवा स्किम्ड डेअरी उत्पादनं वापरणं हा एक चांगला पर्याय असू शकतो.
advertisement
यूरिक ॲसिड वाढू नये यासाठी काय करता येईल
1 - जास्त पाणी प्या: पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे मूत्रपिंडातून यूरिक ऍसिड बाहेर पडण्यास मदत होते.
2 - फायबरयुक्त पदार्थ: फायबरयुक्त पदार्थ म्हणजे ज्यामध्ये तंतुमयता जास्त असे पदार्थ युरिक ऍसिडची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
3 - व्यायाम : नियमित व्यायाम केल्यामुळे शरीरातील प्युरीनची पातळी कमी होते आणि वजनही नियंत्रणात राहतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 10, 2024 12:20 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Uric Acid - युरिक ॲसिड वाढलं असेल तर या 7 गोष्टींचं सेवन करू नका, वाढू शकते सूज आणि वेदना