शरीरातील साखरेची वाढलेली पातळी कमी करण्यात चांगला परिणाम दिसून येतो. रक्तातील साखर वाढणं आणि त्याचे होणारे दुष्परिणाम आपण ऐकून आहोत. अशा परिस्थितीत, काही मसाले रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत.
रक्तातील वाढलेली साखर किंवा हायपरग्लेसेमिया असेल तर प्रकृती गंभीर होऊ शकते. यामुळे हृदयविकाराचाही धोका उद्भवतो.
advertisement
दालचिनीचा वापर
दालचिनीचं पाणी रोज प्यायल्यास किंवा तुमच्या जेवणात वापरल्यास कार्बोहायड्रेट्सचे विघटन देखील कमी करतं, जेणेकरून खाल्ल्यानंतर रक्तातील साखर अचानक वाढणार नाही. चहा, स्मूदी किंवा ओटमीलमध्ये दालचिनीच्या पाण्याचा वापर करु शकता. दालचिनी इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवते आणि पेशींना ग्लुकोज पोहोचवण्यास मदत करते.
Magnesium : हिवाळ्यात आहाराकडे द्या विशेष लक्ष, मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा करा समावेश
हळद
अनेक वर्षांपासून वापरात असलेला मसाला म्हणजे हळद..प्रत्येक घरात वापरला जाणारा हा मसाला रक्तातील साखर नियंत्रणात ठेवू शकतो. हळदीमध्ये असलेलं कर्क्यूमिन जळजळ कमी करते आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते ज्यामुळे ग्लुकोज नियंत्रित राहतं. भाजी किंवा कडधान्यांव्यतिरिक्त तुम्ही ते दुधात मिसळून पिऊ शकता.
काळी मिरी
रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठीही काळी मिरी खूप चांगली मानली जाते. काळ्या मिरीमध्ये असलेले पाइपरिन ग्लुकोज पूर्णपणे संतुलित ठेवते आणि तुमच्या शरीरात हळदीप्रमाणेच काम करते. सॅलडमध्ये किंवा जेवणामध्ये याचा वापर करु शकता. चहासोबतही याचं सेवन करता येतं.
आलं
आलं हिवाळ्यात खूप फायदेशीर आहे. हे घसा आणि पोटासाठी खूप चांगलं मानलं जातं. आलं इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यासाठी ओळखलं जातं. सूप, चहा किंवा सॅलडमध्ये आल्याचा वापर करु शकता.
शुगर कंट्रोलसाठी ही आहे बेस्ट पद्धत्त, नाश्त्याच्या वेळेचा आहे थेट संबंध, संशोधन काय सांगतं?
मेथी दाणे
मेथी दाणे शरीरासाठीही फायदेशीर असतात. बरेच जण हे दाणे रात्रभर भिजवून ठेवतात आणि सकाळी त्याचं पाणी पितात. यामुळे पोटाशी संबंधित समस्या कमी जाणवतात. तसेच मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर फायबर असतं, ज्यामुळे इन्सुलिनची पातळी संतुलित राहते.
लसूण
लसणामध्ये असलेल्या सल्फरमुळे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी मदत होते. लसणामध्ये ॲलिसिन, सल्फर आणि एस-एलिल सिस्टीन सारखे घटक असतात जी इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात. तसंच शरीराला आवश्यक इन्सुलिन पुरवण्यात मदत होते. तुम्ही रोज सकाळी लसणाच्या काही पाकळ्या खाऊ शकता आणि जेवणातही याचा वापर चांगल्या प्रकारे करता येतो.
हे मसाले योग्य प्रमाणात घेतले पाहिजेत हे लक्षात ठेवा. तुम्ही आधीच मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्हाला खबरदारी घेणं गरजेचं आहे. यासाठी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
