TRENDING:

Healthy Juice : पालक, गाजर आणि बीटाचा रस प्या, आरोग्याच्या अनेक समस्या होतील दूर

Last Updated:

गाजर, बीट आणि पालकाच्या रसामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. या रसामुळे वजन कमी करण्याबरोबरच पचनाशी संबंधित समस्या दूर होतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हिवाळा संपून उन्हाळा सुरू होतोय..हिवाळ्याच्या हंगामात भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात आणि लोक या हंगामात विशेषतः गाजर आणि बीट हमखास खातात. गाजर आणि बीटासह पालकाचा रस
News18
News18
advertisement

तब्येतीसाठी उपयुक्त असतो. पालक, गाजर आणि बीट या तीनही भाज्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतात.

गाजर, बीट आणि पालकाच्या रसामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. या रसामुळे वजन कमी करण्याबरोबरच पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. या रसामध्ये भरपूर जीवनसत्त्वं, खनिजं आणि अँटीऑक्सिडंट असतात.

हंगामी आजारांपासून संरक्षण

हा रस प्यायलामुळे हंगामी आजारांचा धोका कमी होतो. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. गाजरांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. बीट आणि पालकामध्ये आढळणारे पौष्टिक घटक हंगामी आजारांपासून वाचवण्यास मदत करतात.

advertisement

Weight Gain: वजन वाढवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स... खजूर- चणे ठरतील उपयुक्त

बद्धकोष्ठता आणि अपचन

बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या गाजर, बीट आणि पालकाच्या रसानं दूर होऊ शकते. या रसामुळे तुमची पचनक्रिया मजबूत होते. या रसामुळे तुमचं शरीरही डिटॉक्स होतं.

रक्त वाढवण्यासाठी उपयुक्त

पालक आणि बीट या दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं, त्यामुळे शरीरातील अशक्तपणाची भरपाई करण्यास मदत होते. रक्त वाढवण्यासाठी तुम्ही पालक, बीट आणि गाजरचा रस 10 दिवस रोज सकाळी पिऊ शकता.

advertisement

Constipation : बद्धकोष्ठतेवर घरगुती उपाय, रात्री झोपण्यापूर्वी भिजवून ठेवा बडिशेप आणि मनुका

त्वचेसाठी फायदेशीर

गाजर, बीट आणि पालकाचा रस प्यायल्यामुळे त्वचा आतून चमकण्यास मदत होते. शरीराला डिटॉक्स करण्यासाठी हा रस उपयुक्त आहे. 10 दिवस हा रस प्यायल्यानं तुमची त्वचा आतून स्वच्छ होते, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येते. पण तुम्हाला कोणत्याही प्रकारची एलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Healthy Juice : पालक, गाजर आणि बीटाचा रस प्या, आरोग्याच्या अनेक समस्या होतील दूर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल