Weight Gain: वजन वाढवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स... खजूर- चणे ठरतील उपयुक्त

Last Updated:

तुमचं वजन खूप कमी असेल आणि तुम्हाला हेल्दी पद्धतीनं वजन वाढवायचं असेल, तर चणे - खजूर खाणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.

News18
News18
मुंबई: आपण बहुतेकदा वजन कमी करण्यासाठी टिप्स वाचतो पण काहींना वजन वाढवण्यासाठी टिप्स हव्या असतात. काही लोक वजन कमी करण्याच्या चिंतेत असतात, तर काहींना वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तुमचं वजन खूप कमी असेल आणि तुम्हाला वजन वाढवायचं असेल, तर चणे - खजूर खाणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. काहींचं वजन कितीही खाल्लं तरी वाढत नाही, पण काही पदार्थांमुळे हेल्दी पद्धतीनं वजन वाढवण्यास मदत होते.
आजारी किंवा बारीक प्रकृती असलेल्यांना सुका मेवा खाण्याचा‌ सल्ला दिला जातो.‌ यातल्या खजुरामध्ये अनेक पोषक घटक असतात. तसंच, चण्यामध्ये आढळणारे पोषक घटकदेखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. या दोन्हीचं‌ मिश्रण वजन वाढवण्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकतं. खजुरामध्ये कॅलरी, कार्बोहायड्रेट्स, फायबर, जीवनसत्त्व आणि खनिजं यांसारखे पोषक घटक आढळतात, यामुळे निरोगी पद्धतीनं वजन वाढवण्यास मदत होते.
advertisement
चण्यामध्ये प्रथिनं आढळतात. यासोबतच यामध्ये आढळणारे कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस शरीरासाठी फायदेशीर आहेत.
चणे आणि खजूर तुम्ही नुसतं खाऊ शकता किंवा दुधात चणे आणि खजूर बारीक करुन स्मूदी बनवून खाऊ शकता. या दोन्ही घटकांमुळे वजन वाढवता येईल.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Weight Gain: वजन वाढवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स... खजूर- चणे ठरतील उपयुक्त
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement