Omega 3 : ओमेगा - 3 फॅटी ॲसिड्सचं महत्त्व - हृदयाच्या रक्षणासाठी आवश्यक

Last Updated:

ओमेगा - 3 फॅटी ॲसिड आपल्या हृदयासाठी खूप महत्वाचं आहे. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी आणि आपलं हृदय निरोगी ठेवण्यासाठी हा घटक खूप महत्त्वाचा आहे.

News18
News18
मुंबई : सोशल मीडियावर, टिव्हीवर आपण अनेकदा हृदयविकारामुळे होणाऱ्या घटना पाहतो. हृदयविकार हे जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. हृदयविकारामुळे दरवर्षी लाखो जीव जातायत. हृदयविकाराचा झटका येण्यामागे कारणं अनेक आहेत. त्यातील एक महत्त्वाचं कारण म्हणजे ओमेगा-3 फॅटी ॲसिडची कमतरता. याकडे तुमचंही दुर्लक्ष होत असेल तर ही माहिती नक्की वाचा.
ओमेगा- 3 फॅटी ॲसिड्समुळे हृदयाचं रक्षण होतं, हृदय निरोगी ठेवण्यासाठी ओमेगा - 3 फॅटी ॲसिड असलेले कोणते पदार्थ खावेत याबद्दलची महत्त्वाची माहिती. ओमेगा-3 फॅटी ऍसिड आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचा घटक आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी यामुळे मदत होते. याव्यतिरिक्त ओमेगा-३ मुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
ओमेगा -3 फॅटी ॲसिड्समुळे आपल्या हृदयाचं संरक्षण कसं होतं आणि तुम्हाला ओमेगा -3 फॅटी ॲसिड पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी कोणते पदार्थ खावेत पाहूया.
advertisement
रक्तदाब नियंत्रण : उच्च रक्तदाब हा हृदयविकाराचा सर्वात मोठा धोकादायक घटक आहे. ओमेगा -3 मुळे उच्च रक्तदाब असलेल्यांमध्ये रक्तदाब कमी करण्यास मदत होऊ शकते.
ट्रायग्लिसराइड पातळी नियंत्रण : ओमेगा -3 मध्ये ट्रायग्लिसराइड पातळी कमी करण्याची क्षमता असते. रक्तातील उच्च ट्रायग्लिसराइड पातळी हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढवू शकते.
advertisement
चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढवण्यासाठी उपयुक्त: ओमेगा -3 मुळे शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते, तर एलडीएल म्हणजेच (खराब) कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करता येते.
रक्त गोठण्यास प्रतिबंध : ओमेगा -3 फॅटी ॲसिडमुळे गुठळ्या तयार होण्यापासून प्रतिबंध होतो, या गुठळ्या रक्तप्रवाहात अडथळा आणतात, यामुळे हृदयविकाराचा धक्का, ब्रेनस्ट्रोक होऊ शकतो.
धमन्या कडक होण्यापासून प्रतिबंधित: ओमेगा -3 फॅटी ॲसिडमुळे हृदयाची लय स्थिर करण्यास मदत होते आणि ॲरिथमियाची शक्यता कमी होऊ शकते.
advertisement
ओमेगा- 3 फॅटी ॲसिड हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात असंही आढळून आलं आहे.
नियमितपणे ओमेगा -3 फॅटी ऍसिडचं सेवन करणाऱ्यांना, हृदयरोगानं मृत्यू होण्याचा धोका 25 टक्के कमी असतो असंही निरीक्षणात दिसून आलं आहे.
advertisement
ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे स्त्रोत
फॅटी फिश (सॅल्मन, ट्यूना, मॅकरेल यांसारखे मासे)
जवस
चिया सीड्स
अक्रोड
सोयाबीन तेल
यासारख्या अन्न घटकांचा उपयोग होतोच पण त्याव्यतिरिक्तही तुम्ही आहारतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रकृतीची काळजी घ्या.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Omega 3 : ओमेगा - 3 फॅटी ॲसिड्सचं महत्त्व - हृदयाच्या रक्षणासाठी आवश्यक
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement