Constipation : बद्धकोष्ठतेवर घरगुती उपाय, रात्री झोपण्यापूर्वी भिजवून ठेवा बडिशेप आणि मनुका
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
बद्धकोष्ठतेच्या समस्येनं त्रास होत असेल तर दोन घरगुती उपाय केले तर फायदा होईल. रात्री झोपण्यापूर्वी बडिशेप आणि मनुका भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्याबरोबर खा.
मुंबई : बद्धकोष्ठतेच्या समस्येनं त्रास होत असेल तर दोन घरगुती उपाय केले तर फायदा होईल. रात्री झोपण्यापूर्वी बडिशेप आणि मनुका भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्याबरोबर खा.
पोट फुगणं, गॅस होणं, ढेकर येणं, बद्धकोष्ठता अशा पोटाशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. सकाळी उठल्यानंतर पोट नीट साफ होत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. यावर अनेक उपाय उपलब्ध आहेत. सततच्या बद्धकोष्ठतेमुळे इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे बडिशेप आणि मनुका रात्री भिजवणं आणि सकाळी खाल्ल्यानं बद्धकोष्ठतेचा त्रास बऱ्यापैकी कमी होऊ शकतो.
advertisement
तुम्हालाही बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक उपाय केला तर सकाळी उठल्याबरोबर तुमचं पोट साफ होईल.
बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी साठी काय खावं ?
तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येचा त्रास होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा बडीशेप आणि 4-5 मनुके पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर सकाळी चावून खा. हे खाल्ल्यानं बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.
advertisement
बडीशेप खाण्याचे फायदे -
बडीशेप हा स्वयंपाकघरातील एक मसाला आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीन हे बडीशेपमध्ये आढळणारे शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहेत, यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. बडीशेपेमुळे पोट निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकते.
advertisement
मनुका खाण्याचे फायदे
मनुका म्हणजे आरोग्याचे भांडार. मनुकांमध्ये कॅल्शियम, जीवनसत्त्व, लोह, अँटीमाइक्रोबियल, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे अनेक पोषक घटक असतात, जे शरीराला अनेक समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात. भिजवलेल्या मनुका खाल्ल्यानं पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 17, 2025 5:35 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Constipation : बद्धकोष्ठतेवर घरगुती उपाय, रात्री झोपण्यापूर्वी भिजवून ठेवा बडिशेप आणि मनुका