Cardamom : पोटाच्या तक्रारींपासून डोळ्यांना थंडावा देण्यासाठी नैसर्गिक औषध, वेलचीचं पाणी, अनेक समस्या होतील दूर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
अनेक पदार्थांची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी वेलची वापरली जाते. पण वेलचीचं पाणी प्यायल्यानं शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.
मुंबई : बिर्यानीपासून मुखशुद्धीपर्यंत अनेक कारणांसाठी हमखास वापरला जाणारा मसाला म्हणजे वेलची. वेलची हा सर्वात सुगंधी मसाल्यांपैकी एक आहे. अनेक पदार्थांची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी वेलची वापरली जाते. पण वेलचीचं पाणी प्यायल्यानं शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.
2 वेलची रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हे पाणी प्या. याचे अनेक फायदे आहेत. कारण त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक, आयर्न, प्रोटीन आणि फायबर असे अनेक गुणधर्म आढळतात.
advertisement
वेलचीचं पाणी बनवण्यासाठी दोन वेलच्या एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवाव्यात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी उकळून गाळून चहासारखं प्यावं.
वेलची पाणी पिण्याचे फायदे
1. पोटाच्या विकारांवर गुणकारी
वेलचीचं पाणी प्यायल्यानं पचन, गॅस, अपचन, सूज येणं या समस्या कमी होतात. तुम्हालाही या समस्या असतील तर रोज हे पाणी प्या. कधी कधी चुकीच्या खाण्यामुळे पोट फुगण्याची समस्या उद्भवू शकते. यासाठीही वेलची घातलेलं पाणी पिणं फायदेशीर ठरतं.
advertisement
2. हृदय
वेलचीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी वेलचीचं पाणी पिणं उपुयक्त आहे.
3. वजन नियंत्रण
बहुतेक सर्वांसाठी महत्त्वाचा, जिव्हाळ्याचा विषय म्हणजे वजन नियंत्रणात ठेवणं. वेलचीचं पाणी प्यायल्यानं मेटाबॉलिज्म म्हणजेच चयापचयाचा वेग वाढण्यास मदत होते. वजन कमी करायचं असेल तर रोज सकाळी हे पाणी प्या.
advertisement
४. डोळे
वेलचीचा मूळ गुणधर्म थंड असतो. डोळ्यात जळजळ होत असेल तर हे पाणी पिणं फायदेशीर ठरू शकतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 15, 2025 12:58 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Cardamom : पोटाच्या तक्रारींपासून डोळ्यांना थंडावा देण्यासाठी नैसर्गिक औषध, वेलचीचं पाणी, अनेक समस्या होतील दूर