BP Control : रक्तदाब नियंत्रणासाठी महत्त्वाच्या टिप्स, आहार, जीवनशैलीत बदल आवश्यक
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
तुमचं बीपी वाढलं असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर तुम्हाला योग्य सल्ला आणि उपचार देऊ शकतात. पण पुन्हा बीपी वाढू नये यासाठी काही गोष्टी करणं आपल्या हातात आहे.
मुंबई : आहाराचं बदलतं स्वरुप आणि जीवनशैलीतल्या बदलांमुळे रक्तदाब वाढण्याच्या तक्रारी दिसून येतात. रक्तदाब वेळीच नियंत्रण आणणं आवश्यक आहे. तसंच बीपी वाढतं तेव्हा आणि बीपी वाढू नये यासाठी काही गोष्टी टाळणं गरजेचं आहे.
तुमचं बीपी वाढलं असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर तुम्हाला योग्य सल्ला आणि उपचार देऊ शकतात. पण पुन्हा बीपी वाढू नये यासाठी काही गोष्टी करणं आपल्या हातात आहे.
1. तणाव व्यवस्थापन
रक्तदाब वाढण्यामागे तणाव हे प्रमुख कारण आहे. तणावात असताना तुमचं शरीर काही हार्मोन्स सोडते ज्यामुळे हृदयाची गती आणि रक्तदाब वाढतो. त्यामुळे बीपीची समस्या असेल तर तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही योग, ध्यानधारणा करा, छंद जोपासा.
advertisement
2. जास्त मीठ खाऊ नका
मीठामध्ये सोडियम असतं, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. त्यामुळे बीपी वाढल्यास मिठाचे सेवन कमी करा. चिप्स, फरसाण आणि लोणच यांसारख्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्येही मीठ जास्त असते, त्यामुळे तेही खाणं टाळा.
3. कॉफी किंवा चहाचं मर्यादित सेवन
advertisement
कॉफी आणि चहामध्ये कॅफिन असतं, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. त्यामुळे बीपी वाढल्यास चहा - कॉफी पिणं टाळा.
4. दारू किंवा धूम्रपान करू नका
मद्यपान आणि धूम्रपान दोन्हीमुळे रक्तदाब वाढतो. त्यामुळे बीपी वाढल्यास त्यांच्यापासून दूर राहा. नेहमी निरोगी आणि संतुलित जीवनशैलीचा अवलंब करा.
advertisement
5. जास्त व्यायाम टाळा
बीपी वाढलं असेल तर जास्त व्यायाम टाळा. यामुळे रक्तदाब आणखी वाढू शकतो. तुम्ही हलका व्यायाम करू शकता, चालणं किंवा स्ट्रेचिंग करण्यावर भर द्या.
6. औषधं वेळेवर घ्या
बीपीच्या औषधांची वेळ चुकवू नका. औषधांमुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
advertisement
बीपी वाढलं असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर तुम्हाला योग्य सल्ला आणि उपचार देऊ शकतात. बीपी वाढल्यावर किंवा वाढू नये म्हणून या गोष्टी नियमित केल्यानं तुम्ही रक्तदाब नियंत्रणात ठेऊ शकता. निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा आणि रक्तदाब नियमितपणे तपासा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 15, 2025 11:33 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
BP Control : रक्तदाब नियंत्रणासाठी महत्त्वाच्या टिप्स, आहार, जीवनशैलीत बदल आवश्यक