Makhana Milk : शरीराला आतून मजबूत करण्यासाठी टिप्स, आजारी पडण्याचं प्रमाण होईल कमी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
तब्येत चांगली ठेवण्यासाठी दूध पिणं हा उपाय आहेच. शिवाय दुधासोबत मखाणा आणि खजूर खाल्ल्यानं शरीर आतून मजबूत होण्यास मदत होते.
मुंबई : आपण कोणते अन्नपदार्थ खातो यावर आपली प्रकृती अवलंबून असते. आहारात जंक फूड आणि बाहेरचे पदार्थ असतील तर पुरेसे पोषक घटक मिळत नाहीत. त्यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. खाण्याच्या चुकीच्या सवयींचाही आपल्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं. अशावेळी आहारात शरीराला आतून मजबूत करण्यासाठी आवश्यक बदल करणं गरजेचं असतं. तब्येत चांगली ठेवण्यासाठी दूध पिणं हा उपाय आहेच. शिवाय दुधासोबत मखाणा आणि खजूर खाल्ल्यानं शरीर आतून मजबूत होण्यास मदत होते.
खजूर आणि मखाणा खाल्ल्यानं पचनाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. या दोन्हीमध्ये फायबर असल्यानं ते पचनासाठी फायदेशीर आहे. याशिवाय रात्री हे दूध प्यायल्यानं स्लीपिंग हार्मोन वाढण्यास मदत होते.
advertisement
कृती :
हे दूध बनवण्यासाठी आधी खजूर आणि मखाणा बारीक चिरून घ्या. आता दूध तापायला ठेवा. उकळी आली की मखाणा आणि खजूर घालून उकळा. दूध थोडं कमी होऊन घट्ट होईपर्यंत उकळवा. यानंतर चवीनुसार साखर घालून प्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 14, 2025 7:34 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Makhana Milk : शरीराला आतून मजबूत करण्यासाठी टिप्स, आजारी पडण्याचं प्रमाण होईल कमी