Beetroot : पोषक असलं तरी काहीच्या तब्येतीसाठी बीट खाणं हानिकारक....या टिप्स नक्की लक्षात ठेवा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
लोहाचा उत्तम स्रोत म्हणून बीट खाण्याचा सल्ला दिला जातो. पण काहींसाठी हानिकारक असू शकतं. औषधी गुणधर्म असलेलं बीट काहींसाठी समस्या देखील ठरू शकते.
मुंबई: लोहाचा उत्तम स्रोत म्हणून बीट खाण्याचा सल्ला दिला जातो. पण काहींसाठी हानिकारक असू शकतं. औषधी गुणधर्म असलेलं बीट काहींसाठी समस्या देखील ठरू शकते.
औषधी गुणधर्मांमुळे बीट हे एक सुपरफूड आहे, त्यात मिळणारी पोषक तत्व तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहेत. यामुळे तुमची त्वचा, केस आणि पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळू शकतो. याशिवाय ॲनिमियासारख्या आजारात शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठीही बीट खाल्लं जातं.
advertisement
बीट कोणी खाऊ नये ?
किडनी विकार
किडनीशी संबंधित समस्या असतील तर बीट खाणं टाळावं. त्यात ऑक्सलेटचं प्रमाण जास्त असल्यानं किडनी स्टोनची समस्या आणखी वाढू शकते.
कमी रक्तदाब
कमी रक्तदाबाचा त्रास होत असलेल्यांनी बीट खाणं टाळावं. कारण त्यात नायट्रेट असतं, ज्यामुळे लो बीपीची समस्या वाढू शकते. त्यामुळे रक्तदाबाची समस्या असेल तर बीट खाणं टाळा. यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते.
advertisement
रक्तातील साखर
रक्तातील साखरेच्या रुग्णांनी देखील बीट खाणं टाळावं. यामुळे तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी असंतुलित होऊ शकते. याशिवाय हेमोक्रोमॅटोसिस सारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी बीट खाणं टाळावं.
पचनविकार
ज्यांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी देखील बीट खाणं टाळावं. बीटामध्ये फायबर जास्त असल्यामुळे इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) किंवा इतर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल विकारांची लक्षणं वाढू शकतात.
advertisement
ऍलर्जी
तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल तर बीट खाणं टाळावं. बीट खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 15, 2025 6:27 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Beetroot : पोषक असलं तरी काहीच्या तब्येतीसाठी बीट खाणं हानिकारक....या टिप्स नक्की लक्षात ठेवा