advertisement

दुसऱ्या लग्नासाठी बाँड पेपर लिहून दे, वंशाच्या दिव्यासाठी सुनेचा घेतला जीव; बीडची घटना

Last Updated:

पतीच्या दुसऱ्या लग्नासाठी दबाव टाकल्यामुळे बीड जिल्ह्यातील म्हाळसापूर येथील भक्ती अमोल कोरडे या विवाहितेने मृत्यूला कवटाळले आहे.

News18
News18
बीड: एकीकडे आपण 'मुलगा-मुलगी एकसमान' असल्याचे सांगत आहे अन् तर दुसरीकडे आजही वंशाच्या दिव्यासाठी एका निष्पाप माऊलीचा बळी घेतला जात आहे. मुलगा होत नसल्याच्या कारणावरून आणि पतीच्या दुसऱ्या लग्नासाठी दबाव टाकल्यामुळे बीड जिल्ह्यातील म्हाळसापूर येथील भक्ती अमोल कोरडे या विवाहितेने मृत्यूला कवटाळले आहे. गेल्या महिनाभरापासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या भक्तीचा अखेर 6 मार्च रोजी उपचारादरम्यान करुण अंत झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भक्तीचा विवाह म्हाळसापूर येथील अमोल कोरडे याच्याशी झाला होता. संसाराच्या वेलीवर तीन गोंडस मुलींची फुले उमलली. मात्र, हे सुख सासरच्या मंडळींच्या डोळ्यांत खुपू लागले. तुला फक्त मुलीच होतात, घराण्याला वारस हवा आहे, असे म्हणत पती अमोल, सासरा अर्जुन कोरडे आणि सासू आशाबाई कोरडे यांनी मागील अडीच वर्षांपासून भक्तीचा छळ सुरू केला होता. शारीरिक आणि मानसिक त्रासाने तिचे जगणे असह्य झाले होते.
advertisement

दुसरे लग्न करण्यासाठी मागत होते परवानगी

सासरच्या मंडळींचा नराधमपणा इतक्यावरच थांबला नाही. पती अमोल याला दुसरे लग्न करायचे असल्याने भक्तीने त्याला संमती द्यावी, यासाठी तिच्यावर अमानुष दबाव टाकला जात होता. "तू दुसऱ्या लग्नाला परवानगी दे आणि तसे बाँड पेपरवर लिहून दे, अशी सक्ती करत तिला वारंवार मारहाण केली जात असे. आपल्या तीन मुलींच्या भविष्याचा विचार करून भक्ती हा अपमान सोसत होती, मात्र सासरच्या मंडळींचा क्रूरपणा वाढतच गेला.
advertisement

महिनाभरापासून मृत्यूशी झुंज  

सततचा अपमान आणि छळाला कंटाळून भक्तीने 2 फेब्रुवारी 2026  रोजी सकाळी राहत्या घरी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तातडीने बीड येथील जिल्हा रुग्णालयात आणि नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल महिनाभर डॉक्टरांनी तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र ६ मार्च रोजी तिची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे म्हाळसापूर परिसरात संतापाची लाट उसळली असून, आपल्या आईच्या मायेला पारख्या झालेल्या त्या तीन मुलींच्या आक्रोशाने उपस्थितांचे काळीज पिळवटून निघाले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. भक्तीच्या मृत्यूनंतर तिची आई गंगूबाई प्रभू ठोकळ यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी पती अमोल कोरडे, सासरा अर्जुन कोरडे आणि सासू आशाबाई कोरडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दुसऱ्या लग्नासाठी बाँड पेपर लिहून दे, वंशाच्या दिव्यासाठी सुनेचा घेतला जीव; बीडची घटना
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement