नारळ पाणी
निसर्गानं दिलेलं सुपरफूड म्हणजे नारळाचं पाणी...नारळाच्या पाण्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यासारखे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असतात. नारळाच्या पाण्यानं डिहायड्रेशन टाळता येतं. नारळ पाण्यासारख्या नैसर्गिक स्रोतामुळे शरीराला आवश्यक खनिजं मिळतात. तसंच, उन्हाळ्यात सर्वात आवश्यक म्हणजे शरीर थंड राहणं, ही गरज नारळ पाण्यानं पूर्ण होते आणि ऊर्जावान वाटतं.
Heat Stroke : उष्माघाताची लक्षणं ओळखा, उन्हाळ्यात प्रकृतीची घ्या काळजी
advertisement
एवोकॅडो
एवोकॅडो हे फळ, फायबर आणि अनेक जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे. एवोकॅडो हृदयासाठी देखील चांगलं मानलं जातं. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फोलेट, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. उन्हाळ्यात हे फळ खूपच उपयुक्त आहे. शरीराला पुरेशी आर्द्रता पुरवणं, त्वचेचं आरोग्य सुधारणं आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही एवोकॅडो हा चांगला स्रोत आहे. याशिवाय, पचन सुधारण्यासाठी आणि वजन नियंत्रणासाठीही एवोकॅडो हा चांगला पर्याय आहे.
दही
दही हा प्रोबायोटिक युक्त दुग्धजन्य पदार्थ. उन्हाळ्यात दही खाण्यानं थंडावा मिळतो तसंच उन्हाळ्यात दही खाल्ल्यानं पचनक्रियेला आराम मिळतो. याशिवाय, दही नियमित खाल्ल्यानं रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
काकडी
उन्हाळ्यासाठी काकडी खाणं खूपच फायदेशीर मानलं जातं. उन्हाळ्यात हायड्रेशनसाठी दही हा उत्तम पर्याय आहे. त्यात व्हिटॅमिन के आणि अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, यामुळे त्वचा उजळते, शरीर डिटॉक्स होतं आणि काकडीमुळे जळजळही कमी होते.
कलिंगड
कलिंगड हे उन्हाळ्यातील सर्वात लोकप्रिय फळ. कलिंगडात लायकोपीनसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेसाठी आणि उर्जेसाठी फायदेशीर असतात. कलिंगड खाल्ल्यानं हायड्रेशन वाढतं, आणि स्नायूंमध्ये येणाऱ्या पेटके कमी होतात.
Summer Care : उन्हाळ्यात त्वचेवर येणाऱ्या फोडांवर हे उपाय करा, महिनाभरात दिसेल परिणाम
बेरी
बेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व भरपूर असतात. यामुळेही उन्हाळ्यात ताजेपणा जाणवतो. बेरीमध्ये असलेले अँथोसायनिन्समुळे जळजळ कमी होते. तसंच, बेरीमुळे हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं.
हिरव्या भाज्या
हिरव्या भाज्यांमध्ये जीवनसत्त्व, खनिजं आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं आणि उन्हाळ्यात हा सर्वोत्तम आहार मानला जातो. तसंच, चिया सीड्समधेही ओमेगा-3, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात.
उन्हाळ्यात चिया सीड्समुळे शरीर बराच काळ हायड्रेट राहतं. याशिवाय, पचन, हृदयाच्या आरोग्यासाठीही हे उपयुक्त आहे.