Heat Stroke : हीट क्रॅम्प्स का येतात ? उन्हाळ्यात काळजी घेण्यासाठी या टिप्स नक्की वापरा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
उन्हाळ्यात उष्माघातापूर्वी लक्षणं दिसतात, ही लक्षणं कशी ओळखायची याविषयी डॉक्टरांनी ती कशी ओळखायची याविषयीची माहिती दिली आहे. ही लक्षणं ओळखली तरी उष्माघाताचा धोका टळू शकतो.
मुंबई : उन्हाळ्यात अनेकांना उष्माघाताचा त्रास होतो, या त्रासामुळे एखाद्याला रुग्णालयातही दाखल करावं लागू शकतं. उन्हाळ्यात उष्माघातापूर्वी लक्षणं दिसतात, ही लक्षणं कशी ओळखायची याविषयी डॉक्टरांनी ती कशी ओळखायची याविषयीची माहिती दिली आहे. ही लक्षणं ओळखली तरी उष्माघाताचा धोका टळू शकतो आणि प्रकृतीचं नुकसानही.
उन्हाळ्यात कडक उन्हात बाहेर न जाण्याचा सल्ला दिला जातो. कारण जास्त उष्णतेमुळे शरीराचं खूप नुकसान होतं. उष्माघाताच्या लक्षणांना हीट क्रॅम्प्स म्हणतात. उष्माघाताचं लक्षण म्हणजे एखाद्या व्यक्तीला पायात वेदना होऊ लागतात. त्याला अस्वस्थ वाटतं आणि पायांमध्ये ताण जाणवतो. या वेदना असह्य असू शकतात.
advertisement
उष्माघाताचं आणखी एक लक्षण म्हणजे तोंड कोरडं होणं. वारंवार पाणी प्यायल्यानंतरही तोंड कोरडं होणं हे यातलं प्रमुख लक्षण आहे. शरीरात ही दोन लक्षणं दिसली तर अधिक काळजी घ्या. पाण्याचं प्रमाण वाढवा असा सल्ला डॉक्टर देतात.
मुलं आणि वृद्धांमध्ये उष्माघाताची लक्षणं लवकर दिसून येतात आणि त्यांना डिहायड्रेशनचा तीव्र त्रास होतो. तोंड कोरडं होणं आणि पायांमध्ये वेदना होत असल्याची ते तक्रार करत असतील तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
advertisement
उष्माघाताचा त्रास मुलं आणि वृद्धांसोबतच, जे लोक सर्वात जास्त कॉफी पितात त्यांनाही उष्माघाताची लक्षणं दिसण्याची शक्यता जास्त असते. कॉफीमुळे शरीर डिहायड्रेट होतं. यासोबतच, बिअर पिणाऱ्यांमध्ये उष्माघाताची लक्षणं दिसून येतात. थंड बिअरमुळे तहान भागत नाही पण शरीर डिहायड्रेट होतं.
उष्माघातामुळे अनेकांना चक्कर येणं, मळमळ, उलट्या होणं, अस्वस्थ वाटणं, हृदयाचे ठोके वाढणं असे त्रासही जाणवू शकतात. त्यामुळे उष्माघाताच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं प्रकृतीसाठी धोक्याचं ठरु शकतं. सतर्क राहा, काळजी घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 16, 2025 5:12 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Heat Stroke : हीट क्रॅम्प्स का येतात ? उन्हाळ्यात काळजी घेण्यासाठी या टिप्स नक्की वापरा