मेरठ : बदलते खानपान यामुळे मानवाच्या आरोग्याला धोका बसत आहे. मनुष्याच्या आरोग्यावर या सर्व गोष्टींचे परिणाम पाहायला मिळत आहेत. यातच हृदय रोगाचाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून यावर एक फळ असे आहे, जे हार्ट अटॅकच्या धोक्याला कमी करू शकते. ते फळ नेमकं कोणतं आहे, त्याचे काय फायदे आहेत, हेच आपण आज जाणून घेऊयात.
advertisement
चौधरी चरणसिंग विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक विजय मलिक यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, चिकू असे या फळाचे नाव आहे. चिकूचे फळ प्रत्येक मोसमात उपलब्ध असते. अशामध्ये जर आपण प्रत्येक दिवशी सकाळी चिकूच्या फळाचा तुमच्या आहारात समावेश केला तर यामुळे नस ब्लॉकेजच्या धोक्याला कमी केले जाऊ शकते.
राष्ट्रपती भवनात तुम्हीही जाऊ शकता, तिकीट फक्त 50 रुपये, फक्त ही आहे छोटीशी प्रोसेस
चिकूमुळे रक्ताभिसरणही चांगल्या पद्धतीने होते. यामुळे हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता कमी होते. यामध्ये असे औषधी गुणधर्म आणि व्हिटामिन गुण आढळतात, जे आरोग्याला फायदेशीर ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, मधुमेहाच्या रुग्णांनी चिकू खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायला हवा, असेही ते म्हणाले.
यामध्ये कोणते व्हिटामिन्स असतात?
प्राध्यापक विजय मलिक सांगतात की, चिकूमध्ये व्हिटामिन बी, सी, ई, कॅल्शियम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम मॅगजीन, फायबर, मिनरल, अँटिऑक्सिन गुण भरपूर प्रणामात आढळतात. त्यामुळे हे फळ हाडांसाठीही फायदेशीर मानले जाते. हाडे मजबूत करण्यासाठी कुठे ना कुठे यामध्ये आढळणारे सर्व कॅल्शियम खूप महत्त्वपूर्ण असतात.
सूचना - ही माहिती तज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे कोणतीही निर्णय घेण्यापूर्वी आरोग्यज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.