राष्ट्रपती भवनात तुम्हीही जाऊ शकता, तिकीट फक्त 50 रुपये, फक्त ही आहे छोटीशी प्रोसेस
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
राष्ट्रपती भवनमध्ये जाण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्हाला एक तिकिट मिळेल. हे तिकिट घेऊन तुम्ही राष्ट्रपती भवनात प्रवशे करू शकतात. तर मग ही नेमकी प्रकिया काय आहे, हे जाणून घेऊयात.
अभिषेक तिवारी, प्रतिनिधी
दिल्ली : जर तुम्हाला देशाचे प्रथम नागरिक म्हणजे राष्ट्रपती यांचे घर म्हणजे राष्ट्रपती भवन पाहाचये असेल तर तुम्ही राष्ट्रपती भवन पाहण्यासाठी कोणत्याही दिवशी जाऊ शकतात. कारण, राष्ट्रपती भवन हे सर्वसामान्य लोकांसाठी खुले आहे.
राष्ट्रपती भवनमध्ये जाण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्हाला एक तिकिट मिळेल. हे तिकिट घेऊन तुम्ही राष्ट्रपती भवनात प्रवशे करू शकतात. तर मग ही नेमकी प्रकिया काय आहे, हे जाणून घेऊयात.
advertisement
राष्ट्रपती भवनात जाण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत वेबसाइट visit.rashtrapatibhavan.gov.in वर जावे लागेल. याठिकाणी पेज ओपन केल्यावर तुम्हाला Book Now वर क्लिक करावे लागेल. Book Now वर क्लिक केल्यावर नवीन पेज सुरू होईल. यामध्ये तुम्हाला ज्यादिवशी आणि ज्या वेळेला जायचे असेल त्यावर सिलेक्ट करावे लागेल. याठिकाणी तुम्ही सकाळी 9:30 वाजेपासून ते 3:30 वाजेपर्यंत दरम्यानच्या काळात कधीही जाऊ शकतात.
advertisement
2 वर्षांपूर्वी झाले लग्न, आता कुत्र्यावरुन नवरा-बायकोमध्ये भांडण, दोघांचं काय म्हणणं?
तारीख आणि वेळ निवडल्यानंतर आणखी नवीन पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमची पर्सनल माहिती टाकायची आहे. जसे की, तुमचे नाव, तुमचे राज्य, तुमच्या जिल्ह्याचे नाव, तुमचा फोन नंबर, ईमेल आयडी इत्यादी. हे सर्व डिटेल्स भरल्यावर आणखी एक नवीन पेज सुरू होईल. यामध्ये तुम्हाला तिकिटाचे पैसे द्यावे लागतील.
advertisement
किती आहे तिकीट -
राष्ट्रपती भवनात जाण्यासाठी तिकिट फक्त 50 रुपये आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यूपीआय आयडी, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करू शकतात. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमचे तिकिट ईमेल आयडीवर मिळून जाईल. तिथून तुम्ही ते डाऊनलोड करू शकतात.
advertisement
असे पोहोचू शकतात राष्ट्रपती भवन -
राष्ट्रपती भवन पोहोचण्यासाठी तुम्ही मेट्रो, बस आणि तुमच्या वाहनातूही जाता येईल. जर तुम्ही मेट्रोने येत आहात तर जवळचे मेट्रो स्टेशन हे उद्योग भवन आहे. तुम्ही बसने येत असाल तर राष्ट्रपति भवनच्या समोरच बस स्टॉप आहे.
Location :
Delhi
First Published :
May 14, 2024 4:12 PM IST
मराठी बातम्या/देश/
राष्ट्रपती भवनात तुम्हीही जाऊ शकता, तिकीट फक्त 50 रुपये, फक्त ही आहे छोटीशी प्रोसेस