पत्नी म्हणाली, मला 5 रुपयांचे कुरकुरे आणून द्या; पतीने दिला नकार, थेट पोलिसांपर्यंत पोहोचलं प्रकरण
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
तरुणीने लग्नाच्या एक वर्षाआधी सदर पोलीस ठाणे क्षेत्रातील एका तरुणासोबत झाली होती. या तरुणीचा पती हा चांदी कारागीर आहे. दोघांमध्ये लग्नानंतर काही दिवस सर्व काही ठीक होते.
हरिकांत शर्मा, प्रतिनिधी
आग्रा : पती आणि पत्नीच्या भांडणाच्या अनेक घटना समोर येत असतात. अगदी लहान लहान गोष्टींवरुनही पती पत्नीमध्ये झालेले दाव विकोपाला जाताना दिसून येतात. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
आग्रा येथील पोलीस लाइनमध्ये प्रत्येक शनिवारी आणि रविवारी समुपदेशन केंद्र चालवले जाते. या समुपदेशन केंद्रात पती पत्नीमधील वाद सोडवण्याचे प्रयत्न केले जातात. याठिकाणी रविवारी पती पत्नीच्या वादातील एक अनोख घटना समोर आली आहे. 5 रुपयांच्या कुरकऱ्यावरुन पती आणि पत्नीमध्ये वाद झाला.
advertisement
आग्रा शहरातील शाहगंज येथील एका तरुणीने लग्नाच्या एक वर्षाआधी सदर पोलीस ठाणे क्षेत्रातील एका तरुणासोबत झाली होती. या तरुणीचा पती हा चांदी कारागीर आहे. दोघांमध्ये लग्नानंतर काही दिवस सर्व काही ठीक होते. मात्र, एक दिवस पत्नीने पतीला कुरकुरे आणायला सांगितले. मात्र, पतीने नकार दिला.
यानंतर पत्नीने स्वत: कुरकरे आणले तर पतीला राग आला. यातून त्याने पत्नीसोबत भांडण केले. दोघांमधील वाद इतका टोकाला गेला की पत्नीने सासर सोडत थेट माहेर गाठले. मागील दोन महिन्यांपासून ही तरुणी माहेरी राहत आहे.
advertisement
लग्नाच्या 6 महिन्यांनी बदलला पतीचा सूर -
पोलीस लाइनमध्ये बसलेले मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सतीश खिरवार यांनी याबाबत माहिती दिली. पत्नीचे म्हणणे आहे की, तिला लग्नाआधीपासूनच कुरकुरे खाणे आवडत होते. मात्र, लग्नानंतर पतीने सहा महिन्यांपर्यंत तिची खूप काळजी घेतली. मात्र, सहान महिन्यांनी त्याची वागणूक बदलली होती. आता तो अगदी लहान लहान गोष्टींवरुन अडवतो. तसेच माझी सासूही त्यालाच साथ देते.
advertisement
लग्नाआधीच नवरदेवाने केली ही मागणी, नवरीने विनंती केली तरी ऐकलं नाही, धक्कादायक घटना
दोन महिन्यांपूर्वी पतीला पाच रुपयांचे कुरकुरे आणण्यासाठी सांगितले तर मला नकार दिला. तसेच मारहाणही केली. मला जेवण मिळो की नको, पण रोज कुरकुरे हवेत. यानंतर पतीने आता पत्नीचे म्हणणे ऐकले आहे. मात्र, समुपदेशकाने पुढची तारीख देत आई-वडिलांना बोलावले आहे.
Location :
Agra,Uttar Pradesh
First Published :
May 14, 2024 3:19 PM IST
मराठी बातम्या/Viral/
पत्नी म्हणाली, मला 5 रुपयांचे कुरकुरे आणून द्या; पतीने दिला नकार, थेट पोलिसांपर्यंत पोहोचलं प्रकरण