उन्हाळ्यात फक्त काहीच दिवस मिळते, सफरचंदासारखे दिसते, डोळे अन् गर्भवती महिलांसाठी खूपच फायदेशीर आहे हे फळ
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
या फळामध्ये बीटा-कॅरोटीन असते, जे व्हिटामिन ए मध्ये बदलते. यामुळे डोळ्यांच्या आरोग्याला मदत होते. जाणून घ्या, या फळाचे सर्व फायदे.
दर्शन शर्मा, प्रतिनिधी
सिरोही : सध्या बाजारात सफरचंदासारखे दिसणाऱ्या एका फळाची खूप विक्री होत आहे. हिंदीत या फळाला आडू असे म्हणतात. तर याच फळाला पीच या नावानेही ओळखले जाते. हे फळ डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते.
पीच फळामध्ये बीटा-कॅरोटीन असते, जे व्हिटामिन ए मध्ये बदलते. यामुळे डोळ्यांच्या आरोग्याला मदत होते. या फळात मधुमेहविरोधी अॅक्टिव्हिटीसोबतच अँटी-ट्यूमर फंक्शन, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटीबायोटिक इत्यादी गुणधर्म आढळतात. या फळाला बाजारात खूप पसंती मिळते.
advertisement
हृदयरोगी आणि गर्भवती महिलांसाठी प्रभावी -
या फळाबाबद आयुर्वेद विभागातील निवृत्त अतिरिक्त संचालक आणि वरिष्ठ आयुर्वेद अधिकारी डॉ. केशव भारद्वाज यांनी माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, पीच फळात पोटॅशियम तत्त्व असल्याने हृदयाची कार्ये सुरळीत राहण्यास मदत होते. यासोबतच हे फळ गर्भवती महिलांसाठी खूपच फायदेशीर असते.
advertisement
रक्तदाबाला कमी करण्यासाठी आणि हृदयाची समस्यांना कमी करण्यासाठीही या फळाचा उपयोग होतो. या फळाचा उपयोग कोलेस्ट्रॉलच्या स्तराला कमी करुन हृदयाला फायदा पोहोचवण्यासाठी केला जातो.
रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत करतो -
या फळात आढळणारे व्हिटामिन सी आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला मजबूत करतो. सोबतच यामध्ये आढळणारे पोटॅशियम किडनीसाठी फायदेशीर असते. केसांच्या मजबूतीसाठी पीच फळाचे सेवन केले जाते. या फळाला कच्चे कधीच म्हणू नये. दररोज तुम्ही नाश्त्यामध्ये 2-3 फळाचे नियमित सेवन करू शकतात, असेही ते म्हणाले.
advertisement
सूचना - ही माहिती आरोग्यतज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे कोणतीही निर्णय घेण्यापूर्वी आरोग्यज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
Location :
Sirohi,Rajasthan
First Published :
May 15, 2024 8:53 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
उन्हाळ्यात फक्त काहीच दिवस मिळते, सफरचंदासारखे दिसते, डोळे अन् गर्भवती महिलांसाठी खूपच फायदेशीर आहे हे फळ