फक्त लक्ष्मी माताच नाही तर या देवताही दूर करतील आर्थिक तंगी, फक्त केळीच्या पानाचा असा करा वापर
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
लोकल18 शी बोलताना ते म्हणाले की, जर तुम्ही देवाला केळीच्या पानावर नैवेद्य दाखवला तर तुम्हाला पूजेचे फळ जास्त मिळेल आणि देवही आनंदी होतील. सर्व धार्मिक विधींमध्ये केळीचा वापर केला जातो.
सच्चिदानंद, प्रतिनिधी
पाटणा : हिंदू धर्मात देवी-देवता यांची पूजा केल्यानंतर नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. नैवेद्य न दाखवता कोणतीही पूजा किंवा विधी यशस्वी होत नाही. नैवेद्य दाखवण्याच्या विविध पद्धती आहेत. याबाबत पाटणा येथील प्रसिद्ध ज्योतिषाचार्य डॉ. श्रीपति त्रिपाठी यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
लोकल18 शी बोलताना ते म्हणाले की, जर तुम्ही देवाला केळीच्या पानावर नैवेद्य दाखवला तर तुम्हाला पूजेचे फळ जास्त मिळेल आणि देवही आनंदी होतील. सर्व धार्मिक विधींमध्ये केळीचा वापर केला जातो.
advertisement
शुद्धतेसोबतच केळीचे पान खूप खास असते. छठ पूजेतही त्याचा वापर केला जातो. अशी मान्यता आहे की, केळीच्या पानावर भगवान विष्णु आणि माता लक्ष्मीचा वास असतो. यासाठी जर केळीच्या पानावर पानावर भगवान विष्णु, माता लक्ष्मी, भगवान गणेश आणि दुर्गा मातेला नैवेद्य अर्पण केला तर कुटुंबात सुख-समृद्धी कायम राहते आणि कुटुंबही आनंदात राहते.
advertisement
भगवान गणेशाला दाखवा हा नैवेद्य -
आधी भगवान गणेशाला केळीच्या पानावर नैवेद्य दाखवणे हे खूपच शुभ आणि फलदायी असते. असे म्हटले जाते की, भगवान गणेशाला केळी खूप आवडतात. त्यामुळे अशावेळी जर त्यांना केळीच्या पानावर नैवेद्य दाखवला तर व्यक्तीच्या आयुष्यातील कठीण समस्या दूर होतात आणि बुध दोषातूनही मुक्ती मिळते.
advertisement
दुर्गा माताला अर्पण करा नैवेद्य -
दुर्गा मातेला केळीच्या पानावर नैवेद्य अर्पण करणे खूपच शुभ मानले गेले आहे. धार्मिक मान्यतेनुसार, जो व्यक्ती मातेला केळीच्या पानावर नैवेद्य अर्पण करतो, त्याच्यावर दुर्गा माता प्रसन्न होते. तसेच त्याच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही. असे केल्याने त्याच्या कुटुंबात सुख शांती कायम राहते.
विष्णुदेवही होतात प्रसन्न -
केळीच्या झाडात भगवान विष्णु आणि माता लक्ष्मीचा वास मानला जातो. त्यामुळे भगवान विष्णुला केळीच्या पानावर नैवेद्य अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. पूजा अर्चना करताना तुम्ही जर केळीच्या पानाचा वापर केला तर यामुळे तुमच्यामुळे श्री हरी आणि माता लक्ष्मीची पूजा कायम राहते. तसेच जर तुम्ही भगवान विष्णुला केळीच्या पानावर नैवेद्य अर्पण केला तर लग्नात येणारे अडथळेही दूर होतात आणि घरात सुख समृद्धी कायम राहते.
advertisement
लक्ष्मी मातेला अर्पण करा केळीच्या पानावर नैवेद्य -
लक्ष्मी मातेला केळीच्या पानावर नैवेद्य अर्पण केल्याने आर्थिक समस्या दूर होतील. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी केळीच्या पानावर नैवेद्य अर्पण करावा. यामुळे आयुष्यात कधीच पैशांचे संकट येत नाही आणि व्यक्तीची आर्थिक समस्यांपासून सुटका होते.
advertisement
सूचना - ही माहिती ज्योतिषाचार्यांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
Location :
Patna,Bihar
First Published :
May 15, 2024 8:23 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
फक्त लक्ष्मी माताच नाही तर या देवताही दूर करतील आर्थिक तंगी, फक्त केळीच्या पानाचा असा करा वापर