उन्हाळ्यात वजन कमी करायचं असेल तर तीन सोपे मार्ग लक्षात ठेवा. या गोष्टी केल्या तर शरीरात आपोआप फरक दिसून येईल. उन्हाळा हा वजन कमी करण्यासाठी योग्य काळ आहे. या ऋतूत शरीरातील चयापचयाचा वेग जलद असतो आणि त्यामुळे हलकं वाटतं. यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय वापरले तर लवकरच तुमच्या शरीरात बदल दिसू लागतील.
advertisement
योग्य आहार, नियमित व्यायाम आणि चांगली झोप, हे तीन प्रभावी पर्याय उन्हाळ्याच्या दिवसात वजन कमी करण्यास मदत करू शकतात. आहारात खूप बदल न करता किंवा खूप कसरत न करताही तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकता.
Summer Care : उष्णतेचे दिवसही सुपरकुल करणारे पदार्थ, शरीराला मिळेल थंडावा
उन्हाळ्यात वजन कमी करण्याच्या टिप्स
1. हायड्रेटेड रहा आणि योग्य आहार घ्या
उन्हाळ्यात खूप घाम येतो, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. पुरेसं पाणी प्यायल्यानं चयापचयाचा वेग चांगला राहिलच शिवाय भूकही नियंत्रित होईल. तसंच, फळं, भाज्या आणि प्रथिनं असलेला आहार खाण्याला प्राधान्य द्या. तेलकट आणि गोड पदार्थ खाणं टाळा.
2. व्यायामाकडे लक्ष द्या
उन्हाळ्यात सकाळी किंवा संध्याकाळी चालणं, धावणं, सायकलिंग किंवा पोहणं फायदेशीर ठरतं. यामुळे कॅलरीज जलद बर्न होण्यास मदत होते. याशिवाय, उष्णतेमुळे शरीर लवकर थकत नाही, ज्यामुळे कसरत अधिक प्रभावी होते.
Summer Care : दुपारी 12-3 मधे बाहेर पडत असाल तर सावध राहा, ही माहिती नक्की वाचा
3. पुरेशी झोप घ्या
उन्हाळ्यात चांगली झोप घेतल्यानं वजन कमी करण्याची प्रक्रिया सोपी होते. पुरेशी झोप झाली नाही तर तणाव संप्रेरक असलेल्या कॉर्टिसॉलचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे वजन वाढू शकतं. झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम कमी करा. दिनचर्येत हे छोटे बदल केले तर शरीरात काही दिवसातच फरक दिसू लागेल.