Summer Care : दुपारी 12-3 मधे बाहेर पडत असाल तर सावध राहा, ही माहिती नक्की वाचा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
उन्हाळ्यात सर्वांनाच प्रचंड उष्म्याचा सामना करावा लागतो, शरीरासाठी तीव्र ऊन खूप धोकादायक असतं. त्यामुळे बाहेर जाताना काही गोष्टी पाळणं सर्व वयोगटांसाठी आवश्यक आहे.
मुंबई : उन्हाळ्यात 12ते 3च्या दरम्यान घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातो. पण कोणत्याही कारणास्तव तुम्हाला जायचं असेल, तर घराबाहेर पडण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या गोष्टींची सर्वात जास्त काळजी घेणं आवश्यक आहे ते जाणून घेऊया.
उन्हाळ्यात सर्वांनाच प्रचंड उष्म्याचा सामना करावा लागतो, शरीरासाठी तीव्र ऊन खूप धोकादायक असतं. त्यामुळे बाहेर जाताना काही गोष्टी पाळणं सर्व वयोगटांसाठी आवश्यक आहे.
- दुपारी 12 ते 3 वाजण्याच्या दरम्यान शक्यतो घराबाहेर पडू नका.
उन्हाळ्यात दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत बाहेर न जाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. या तीन तासात उष्मा सर्वाधिक असतो. वृद्ध आणि लहान मुलांना उष्माघातापासून वाचवायचं असेल तर त्यांना दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान घराबाहेर पडू देऊ नका. कारण यामुळे त्यांना चक्कर येऊ शकते. तोल जाऊन शरीराला इजा होऊ शकते.
advertisement
- पण काही कारणास्तव तुम्हाला या तीन तासांत बाहेर जायचं असेल तर हलके आणि सैल कपडे घाला. जाड कपड्यांऐवजी हलके आणि घाम पटकन शोषणारे म्हणजेच सुती कपडे घाला. यामुळे तीव्र उन्हाळ्यात शरीराचं तापमान योग्य ठेवता येतं.
- या तीन तासांत घराबाहेर पडत असाल तर कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी डोकं झाकलेलं असणं गरजेचं आहे. यासाठी टोपी किंवा ओढणी, स्कार्फचा वापर करा. छत्री वापरुनही तुम्ही डोक्याचं रक्षण करु शकता.
advertisement
- 12 ते 3 वाजण्याच्या दरम्यान प्रवास करत असाल, तर सर्वात महत्वाचं म्हणजे कडक उन्हात तासन्तास प्रवास करू नका, त्याऐवजी सावलीच्या ठिकाणी थांबून मध्येच विश्रांती घ्या.
- उष्णतेची लाट जोरात असतना, स्वतःला हायड्रेटेड ठेवणं महत्वाचं आहे, म्हणून प्रवासादरम्यान पाणी पिणं आवश्यक आहे. पण एकाच वेळी आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पिऊ नका, तर मधे मधे पाणी पित राहा. बाहेर जायचं असेल तर पाण्यात थोडं मीठ देखील घालू शकता, उष्णतेच्या दिवसात ते शरीरासाठी फायदेशीर ठरेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 17, 2025 5:51 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Care : दुपारी 12-3 मधे बाहेर पडत असाल तर सावध राहा, ही माहिती नक्की वाचा