Summer Care : उन्हाळ्यात राहा फ्रेश, या सूपरफूड्सनी मिळेल ताकद
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
खूप उन्हातही ऊर्जा कायम ठेवायची असेल तर काही सुपरफूड्सची मदत होईल. यामुळे उन्हाळ्यात ताजंतवानं वाटतं आणि भरपूर ऊर्जाही मिळते.
मुंबई : उन्हाळा ऋतू म्हटलं की कडक उन्हाचा तडाखा, घाम आणि थकवा. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटेड आणि निरोगी ठेवणं खूप महत्वाचं आहे. शरीराला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी, उन्हाळ्यातील 'सुपरफूड्स' मुळे ताजंतवानं वाटतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास देखील मदत होते.
नारळ पाणी
निसर्गानं दिलेलं सुपरफूड म्हणजे नारळाचं पाणी...नारळाच्या पाण्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यासारखे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असतात. नारळाच्या पाण्यानं डिहायड्रेशन टाळता येतं. नारळ पाण्यासारख्या नैसर्गिक स्रोतामुळे शरीराला आवश्यक खनिजं मिळतात. तसंच, उन्हाळ्यात सर्वात आवश्यक म्हणजे शरीर थंड राहणं, ही गरज नारळ पाण्यानं पूर्ण होते आणि ऊर्जावान वाटतं.
advertisement
एवोकॅडो
एवोकॅडो हे फळ, फायबर आणि अनेक जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे. एवोकॅडो हृदयासाठी देखील चांगलं मानलं जातं. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फोलेट, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. उन्हाळ्यात हे फळ खूपच उपयुक्त आहे. शरीराला पुरेशी आर्द्रता पुरवणं, त्वचेचं आरोग्य सुधारणं आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही एवोकॅडो हा चांगला स्रोत आहे. याशिवाय, पचन सुधारण्यासाठी आणि वजन नियंत्रणासाठीही एवोकॅडो हा चांगला पर्याय आहे.
advertisement
दही
दही हा प्रोबायोटिक युक्त दुग्धजन्य पदार्थ. उन्हाळ्यात दही खाण्यानं थंडावा मिळतो तसंच उन्हाळ्यात दही खाल्ल्यानं पचनक्रियेला आराम मिळतो. याशिवाय, दही नियमित खाल्ल्यानं रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
काकडी
उन्हाळ्यासाठी काकडी खाणं खूपच फायदेशीर मानलं जातं. उन्हाळ्यात हायड्रेशनसाठी दही हा उत्तम पर्याय आहे. त्यात व्हिटॅमिन के आणि अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, यामुळे त्वचा उजळते, शरीर डिटॉक्स होतं आणि काकडीमुळे जळजळही कमी होते.
advertisement
कलिंगड
कलिंगड हे उन्हाळ्यातील सर्वात लोकप्रिय फळ. कलिंगडात लायकोपीनसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेसाठी आणि उर्जेसाठी फायदेशीर असतात. कलिंगड खाल्ल्यानं हायड्रेशन वाढतं, आणि स्नायूंमध्ये येणाऱ्या पेटके कमी होतात.
बेरी
बेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व भरपूर असतात. यामुळेही उन्हाळ्यात ताजेपणा जाणवतो. बेरीमध्ये असलेले अँथोसायनिन्समुळे जळजळ कमी होते. तसंच, बेरीमुळे हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं.
advertisement
हिरव्या भाज्या
हिरव्या भाज्यांमध्ये जीवनसत्त्व, खनिजं आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं आणि उन्हाळ्यात हा सर्वोत्तम आहार मानला जातो. तसंच, चिया सीड्समधेही ओमेगा-3, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात.
उन्हाळ्यात चिया सीड्समुळे शरीर बराच काळ हायड्रेट राहतं. याशिवाय, पचन, हृदयाच्या आरोग्यासाठीही हे उपयुक्त आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 16, 2025 6:34 PM IST