तुळशीचा काढा पिण्याचे फायदे
रोगप्रतिकारशक्ती वाढवते : तुळशीमध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण करतात. पावसाळ्यात विषाणू आणि बॅक्टेरियामुळे शारीरिक समस्यांचा धोका लक्षणीय वाढतो. तुम्हाला या सर्व शारीरिक समस्या टाळायच्या असतील, तर नियमितपणे तुळशीचा काढा प्या किंवा तुळशीची पाने खा. सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचा काढा बनवून पिण्याचा सल्ला वडीलधारी मंडळी देत आले आहेत.
advertisement
इतर पोषक तत्वे : तुळशीमध्ये व्हिटॅमिन सी, झिंक, लोह इत्यादी असतात, जे रोगप्रतिकारशक्ती सुधारतात. तुळशीचा काढा प्यायल्याने घसा खवखवणे, खोकला आणि सर्दी बरे होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. यात ॲडॉप्टोजेन गुणधर्म असतात, जे तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी उपयुक्त असतात.
पोटाच्या समस्या दूर करते : तुळशीचा काढा पोटातली गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता देखील दूर करतो. याच्या सेवनाने दमा, ब्राँकायटिस आणि श्वसनाच्या इतर समस्यांमध्ये आराम मिळतो.
ताप कमी करते : ताप आल्यावर तुळशीचा काढा प्यायल्याने खूप आराम मिळतो. ते शरीराचे तापमान नियंत्रित करते. इतकंच नाही, तर हा काढा त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. तुम्ही मुरुमांपासून सुटका मिळवू शकता. त्वचेच्या संसर्गावरही ते उपयुक्त आहे.
तुळशीचा काढा कसा बनवायचा?
तुळशीचा काढा बनवण्यासाठी, तुळशीची 5-7 पाने घ्या. ती पाण्याने धुवा. एका भांड्यात एक कप पाणी टाका. गॅसवर ठेवा, त्यात ही पाने टाका आणि उकळा. त्यात थोडं किसलेलं आलं टाका. तुम्ही काळी मिरी देखील टाकू शकता. मध्यम आचेवर सुमारे पाच ते सात मिनिटे उकळू द्या. आता ते गाळून घ्या. चव कडू लागल्यास थोडं मध टाका. दिवसातून एकदाच प्या किंवा सेवन करण्यापूर्वी वैद्य किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला कोणताही आजार असल्यास, त्याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. मात्र, तुळशीचा काढा पूर्णपणे नैसर्गिक आणि घरगुती आहे, तो प्यायल्याने जास्त फायदे आणि खूप कमी तोटे होतात.
हे ही वाचा : घरात फ्रिज नाहीये? हरकत नाही, कडक उन्हातही 'या' 5 नैसर्गिक पद्धत्तींनी पाणी होऊ शकतं थंडगार!
हे ही वाचा : मासे ताजे आहेत की नाही, कसे ओळखाल? प्रसिद्ध शेफ अजय चोप्रा यांनी सांगितल्या 'या' 5 सोप्या टिप्स!
