व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेच्या लक्षणांमध्ये थकवा, डोकेदुखी, नैराश्य, निस्तेज त्वचा, आणि तोंडात आणि जीभेमध्ये वेदना आणि सूज यांचा समावेश होतो. जर तुम्हालाही व्हिटॅमिन बी12 ची कमतरता जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकता.
Curry Leaves : कढीपत्ता आहे केसांसाठी वरदान, या गोष्टी मिसळून लावा पेस्ट, केस होतील लांबलचक
advertisement
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करण्यासाठी आहारात गुळाचा समावेश करू शकता. गूळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात गुळाचं सेवन केल्यानं शरीराला अनेक फायदे मिळतात. कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, जस्त, तांबे, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, फॉलिक ॲसिड, लोह यासारखे गुणधर्म गुळात आढळतात. गुळात व्हिटॅमिन बी12 चांगल्या प्रमाणात असतं.
1. पाण्यासोबत गुळ खा -
तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत गुळ खाऊ शकता. यामुळे व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर करण्यास मदत होते आणि पचन सुधारण्यास देखील मदत करते.
How to Drink Water: उभं राहून पाणी प्यायल्याने गुडघे दुखतात?
2. गुळाचा चहा -
जर तुम्हाला असा गूळ खायला आवडत नसेल तर तुम्ही सकाळी नेहमीच्या चहाऐवजी गुळाचा चहा घेऊ शकता.
३. दुधासह गुळ -
दुधासोबतही गुळाचं सेवन करता येते. दूध आणि गूळ एकत्र सेवन केलं तर शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.
