भारत आणि अमेरिका या दोन मोठ्या देशांमध्ये 2030 पर्यंत व्यापार वाढवून 500 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, डेअरी प्रॉडक्ट्सच्या आयातीवरून वाद निर्माण झाला आहे, जो थेट धार्मिक आणि सांस्कृतिक भावनांशी जोडलेला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ‘नॉन-वेज दूध’. परंपरेनुसार, दूध हे शाकाहारी (व्हेज) मानलं जातं. कारण ते प्राण्यांची हत्या न करता मिळवले जाते.
advertisement
Shravan Month 2025 : श्रावणात उपवास करताय? काय खावे आणि काय खाऊ नये? ही चूक तर तुम्ही करत नाही ना?
हिंदू धर्मात दूध हे पवित्र मानले जाते आणि ते देवाला नैवेद्य म्हणूनही अर्पण केलं जातं. त्यामुळे बहुसंख्य शाकाहारी लोक दूध, दही, तूप, पनीर या दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करतात. भारतामध्ये हिंदू आणि जैन धर्मीय लोक गायीला अत्यंत पवित्र मानतात. ते फक्त गायीचं दूधच पवित्र मानतात, पण ती गायही पूर्ण शाकाहारी चारा खाणारी असली पाहिजे, ही त्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे अशा गायीकडून मिळणारं दूध पवित्र मानल जातं.
अमेरिकेतील डेअरी उद्योगात मोठ्या प्रमाणावर प्रोटीनयुक्त चारा दिला जातो. हे चारे स्वस्त व पोषक असतात, त्यामुळे त्यात प्राणीजन्य घटक मिसळले जातात. अमेरिकन कंपन्यांचं म्हणणं आहे की, दूध तर गायीच्या शरीरातून मिळतं, चाऱ्यापासून नाही, त्यामुळे तो नेहमीच शाकाहारी मानावा. त्यांनी भारत सरकारकडून सुचवलेल्या ‘नॉन-वेज’ लेबलिंग (लाल चिन्ह) वरही आक्षेप घेतला आहे.
काय आहे नॉन-व्हेज दूध?
‘नॉन-व्हेज दूध’ हा कोणताही अधिकृत वैज्ञानिक शब्द नाही. पण भारत सरकारने अशा प्रकारच्या दूधाला धार्मिकदृष्ट्या शुद्ध न मानता, यावर बंदी घालण्याचा विचार केला आहे. कारण अमेरिकेतील अनेक डेअरी फॉर्म्समध्ये गायींना मांस, हाडांचे चूर्ण, माश्यांचे पावडर, कोंबड्यांचे अवशेष आणि प्राण्यांची चरबी मिसळलेला चारा दिला जातो. त्यामुळे, अशा गायीकडून मिळणारे दूधही ‘शाकाहारी’ राहात नाही, असं भारतातील काही धार्मिक समुदायांचं मत आहे.
भारतातील गायांच्या आहारात काय असतं?
भारतामध्ये बहुतांश ठिकाणी गायींना सुका-ओला चारा, गहू-मका, खळी, कडधान्यांचे दाणे वगैरे दिले जातात. मोठ्या डेअरी फार्ममध्ये काही ठिकाणी पाश्चिमात्य पद्धतींचा प्रभाव दिसतो. मात्र अजूनही आपल्याकडे दुभत्या जनावरांना मांसाहारी चारा देत नाहीत.
शुद्ध शाकाहारी दूध ओळखायचं कसं?
- पॅकिंगवर ‘100% वेजिटेरियन फीड’, ‘गौशाळा आधारित दूध’ अशा टॅग्स पाहा.
- गौशाळांमधून थेट दूध घेणं अधिक विश्वासार्ह असतं.
- A2 गायींचं दूध (जसं गिर किंवा साहीवाल जातीचं) घेणं उत्तम
- ऑरगॅनिक प्रमाणपत्र असलेलं दूध निवडा.
- FSSAI (भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण) ने एक प्रस्ताव मांडला होता की, जर दूध किंवा डेअरी प्रॉडक्ट्स प्राणीजन्य चारा खाणाऱ्या गायींकडून आले असेल, तर त्या उत्पादनावर लाल ‘नॉन-व्हेज’ चिन्ह लावणं बंधनकारक करावं. यामुळे ग्राहकांना माहिती मिळेल.





