Shravan Month 2025 : श्रावणात उपवास करताय? काय खावे आणि काय खाऊ नये? ही चूक तर तुम्ही करत नाही ना?

Last Updated:

Shravan month 2025: श्रावण महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. भगवान शिवाच्या उपासनेला या महिन्यात विशेष महत्त्व असतं.

+
श्रावणातला

श्रावणातला योग्य उपवास कसा करावा याबद्दल माहिती जाणून घ्या

बीड: श्रावण महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. भगवान शिवाच्या उपासनेला या महिन्यात विशेष महत्त्व असतं. याच काळात अनेक भक्त उपवास करून धार्मिक नियमांचं पालन करतात. काही जण दर सोमवारी उपवास करतात, तर काहीजण संपूर्ण महिनाभर फलाहार करतात. मात्र उपवासाचा खरा उद्देश फक्त उपाशी राहणं नसून, शरीर आणि मन शुद्ध करणं हा असतो. त्यामुळे श्रावणातील उपवास करताना योग्य आहार पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं आहे.
बीड शहरातील आरोग्य तज्ज्ञ नागेश भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपवास करताना शरीराला ऊर्जा देणारे आणि हलके पण पोषणमूल्य असलेले पदार्थ घेणं आवश्यक आहे. उपवासात दूध, फळं, सुका मेवा, आणि साबुदाणा, राजगिरा, शिंगाडा अशा पचायला हलक्या पण पोषणमूल्य असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. विशेषतः साजूक तुपात शिजवलेले पदार्थ हे आरोग्यासाठी हितावह असतात. भरपूर पाणी पिणं, नारळपाणी किंवा लिंबूपाणी घेणं शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतं.
advertisement
उपवास करताना तळलेले पदार्थ, मैद्याचे किंवा तयार फास्ट फूड टाळावं. साखरयुक्त शीतपेयं, चहा-कॉफी यांचाही अतिरेक टाळावा. उपवासाच्या नावाखाली गरजेपेक्षा जास्त खाणं टाळणं आवश्यक आहे. यामुळे उपवासाचा हेतूच हरवतो. सकाळी हलकं आणि पोषक आहार घेतल्यास दिवसभराची ऊर्जा टिकवणं सोपं जातं.
advertisement
श्रावण महिना केवळ उपवासाचा नाही, तर मानसिक शांतीचा कालावधीही आहे. संध्याकाळी घरात दिवा लावून शिवपूजन करणं, मंत्रजप करणं किंवा ध्यान लावणं हे मनाला शांतता देतं. अशा पद्धतीने उपवासाला अध्यात्माची जोड मिळते आणि मन अधिक सकारात्मक राहतं. काही जण आठवड्यातून एक दिवस उपवास करतात, काहीजण दररोज फळाहार करतात. दोन्ही पद्धती योग्य आहेत.
advertisement
आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करताना डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. मधुमेह, बीपी किंवा पचनाच्या तक्रारी असलेल्या व्यक्तींनी पथ्य पाळूनच उपवास करावा. योग्य पद्धतीनं आणि मर्यादेत केलेला उपवास आरोग्यास फायदेशीर ठरतो आणि श्रद्धाही वृद्धिंगत होते. त्यामुळे श्रावणात उपवास करताना श्रद्धा आणि आरोग्य यांचं संतुलन राखणं महत्त्वाचं आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Shravan Month 2025 : श्रावणात उपवास करताय? काय खावे आणि काय खाऊ नये? ही चूक तर तुम्ही करत नाही ना?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement