विशेषत: महिलांना ही समस्या जास्त जाणवते. 25 ते 30 वर्षांच्या वयानंतर महिलांचं वजन झपाट्यानं वाढू लागतं. यामुळे त्यांच्या फिटनेसवर परिणाम होतो तसंच आरोग्याशी संबंधित अनेक समस्याही उद्भवू शकतात. ही चरबी टाळण्यासाठी महिलांनी काय करावं हे डॉक्टरांकडून जाणून घेणं गरजेचं आहे.
Periods : मासिक पाळीच्या वेदनांपासून मिळवा आराम, धण्याचं पाणी ठरेल उपयुक्त
advertisement
डॉक्टर योकेश अरुल यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर या संदर्भातला एक व्हिडिओ शेअर केला आहे. अनेक स्त्री रुग्णांची हीच तक्रार असल्याचं ते म्हणाले. आहारात कोणताही बदल केला नाही. पूर्वीसारखाच आहार असूनही, वयाच्या 25 नंतर, मांड्या, दंड किंवा पोटावरील चरबी वेगानं वाढल्याच्या तक्रारी महिला करतात. Muscle Loss म्हणजेच स्नायूंचं नुकसान हे त्यामागचं कारण आहे.
वयाबरोबर महिलांचे स्नायू कमी होऊ लागतात आणि त्याची जागा चरबी घेते त्यामुळे वजन वाढतं आणि हे नेमकं कशामुळे होतं कळत नाही त्यामुळे ही चरबी कशी कमी होईल यासाठी डॉक्टरांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. या प्रकारची चरबी कमी करण्यासाठी वेट ट्रेनिंग करावं लागेल. शरीराच्या या भागांवरील वाढती चरबी कमी करण्यासाठी अनेक महिला झुंबा आणि कार्डिओ करतात. पण अनेकदा त्याचे परिणाम फार काळ टिकत नाहीत. शरीरातील ही चरबी कमी करण्यासाठी वेट ट्रेनिंग हा चांगला पर्याय आहे.
डॉक्टर योकेश यांच्या मते, weight training मुळे चरबी कमी करण्यास मदत होईल. मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास तसेच PCOS ची लक्षणं 90% पर्यंत कमी करण्यास यामुळे मदत होऊ शकते. हे प्रशिक्षण करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
