advertisement

Periods : मासिक पाळीच्या वेदनांपासून मिळवा आराम, धण्याचं पाणी ठरेल उपयुक्त

Last Updated:

पाळी नियमित आली नाही की, जेव्हा सुरु होते तेव्हा खूप वेदना आणि त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी धण्याचं पाणी हा एक परिपूर्ण उपाय आहे. मासिक पाळीतील अनियमितता, मासिक पाळीतील दुखणं आणि संप्रेरकांचं संतुलन यामुळे शक्य होतं. धण्याचं पाणी प्यायल्यामुळे, महिनाभरातच तुम्हाला फरक दिसेल.

News18
News18
मुंबई : मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर डॉक्टरांनी सुचवलेला एक उपाय तुमच्यासाठी फायदेशीर आहे. मासिक पाळी वेळेवर येत नसेल किंवा पाळी आल्यावर पोटदुखी, पाठदुखी आणि पायात पेटके येत असतील तर एक उपाय नक्की करुन बघा.
मासिक पाळी ही महिलांसाठी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण, अनेकींसाठी ही प्रक्रिया नैसर्गिक असली तरी वेळेत येत नाही. पाळी नियमित आली नाही की, जेव्हा सुरु होते तेव्हा खूप वेदना आणि त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी धण्याचं पाणी हा एक परिपूर्ण उपाय आहे. मासिक पाळीतील अनियमितता, मासिक पाळीतील दुखणं आणि संप्रेरकांचं संतुलन यामुळे शक्य होतं. धण्याचं पाणी प्यायल्यामुळे, महिनाभरातच तुम्हाला फरक दिसेल.
advertisement
महिलांच्या या समस्यांवर डॉ.शिल्पा अरोरा यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओत, डॉ. शिल्पा यांनी धण्याचं पाणी पिण्याचे फायदे सांगितले आहेत. धण्याचं पाणी नियमित प्यायल्यानं, मासिक पाळीच्या सर्व समस्या दूर करण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला धणे आणि पाणी या दोनच घटकांची गरज आहे. मासिक पाळी नियमित करण्यासोबतच पीसीओडीची समस्याही यामुळे कमी होते.
advertisement
धण्याचं पाणी
धण्याचं पाणी बनवण्यासाठी एक चमचा धणे एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी एका पातेल्यात धणे आणि पाणी टाकून चांगलं उकळून घ्या. ते निम्मं झाल्यावर गाळून घ्या. हे पाणी कोमट असताना रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या. ज्या महिला किंवा मुलींना मासिक पाळी वेळेवर येत नाही ते दिवसातून दोन ते तीन वेळा हे पाणी पिऊ शकतात,असं तज्ज्ञ सांगतात.
advertisement
धण्याचं पाणी पिण्याचे फायदे
संप्रेरकांचं संतुलन: इस्ट्रोजेन हार्मोन्स संतुलित करण्यासाठी धणे उपयुक्त ठरतात. यामुळे मासिक पाळीदरम्यान येणारे मूड स्विंग, चिडचिड किंवा थकवा यासारख्या मासिक पाळीच्या समस्या कमी होतात.
शरीराला डिटॉक्स करणं शक्य: धण्यांमुळे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. हे आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. यामुळे चयापचयाचा वेग वाढवण्यासाठीही मदत होते.
advertisement
रक्तस्त्राव नियंत्रित करा: मासिक पाळीत खूप जास्त रक्तस्त्राव होत असेल तर, हे पाणी प्या, रक्तस्त्राव नियंत्रित ठेवण्यास यामुळे मदत होते.
पेटके कमी करण्यासाठी मदत: धण्यामध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म मासिक पाळीत येणारे पेटके आणि वेदना कमी करण्यास मदत करतात.
advertisement
हे लक्षात ठेवा -
- धणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा, सकाळी गाळून प्या.
- धणे पाण्यात उकळून त्यात मध आणि लिंबू घालून चहासारखं बनवू शकता.
- गरम पाण्यात धणे पूड टाकून पिऊ शकता.
- जास्त प्रमाणात पिणं टाळा, कारण यामुळे कमी रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Periods : मासिक पाळीच्या वेदनांपासून मिळवा आराम, धण्याचं पाणी ठरेल उपयुक्त
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement