चालणे आणि सायकलिंग
सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे दररोज चालणे (वॉकिंग). सकाळी किंवा संध्याकाळी अर्धा ते एक तास चालल्याने शरीरात उष्मांक (कॅलरी) कमी होतो आणि चयापचय (मेटाबॉलिझम) वेगाने कार्य करू लागतो. यामुळे केवळ वजनच कमी होत नाही तर हृदयाचे आरोग्य देखील सुधारते. वॉकिंगसोबतच सायकलिंग करणे हाही उत्तम पर्याय ठरतो. दररोज किमान 20 ते 30 मिनिटे सायकल चालवल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी हळूहळू कमी होऊ लागते.
advertisement
Society Cleaning: तुमच्या सोसायटीत कबुतरांनी घरं केली? होऊ शकतो सगळ्यांना गंभीर आजार
आहार आणि पाणी
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहाराचे महत्त्व देखील तितकेच आहे. तुपकट, गोड व तेलकट पदार्थ टाळून फळे, भाज्या, डाळी आणि संपूर्ण धान्यांचा समावेश आहारात करणे आवश्यक आहे. सकस व संतुलित आहारामुळे शरीराला लागणारी उर्जा मिळते आणि अनावश्यक चरबी साठत नाही. त्याचबरोबर भरपूर पाणी पिणे, विशेषत: कोमट पाणी पिण्याची सवय लावल्यास पचनक्रिया सुधारते आणि चरबी कमी होण्यास मदत मिळते.
नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि शिस्तबद्ध दिनचर्या यामुळे वजन सहजपणे नियंत्रणात राहते. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून घेतल्यास शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात आणि चयापचय क्रिया वेगवान होते. दिवसातून थोड्या-थोड्या अंतराने कमी पण पौष्टिक आहार घेणे हा देखील उत्तम उपाय आहे.
निश्चितच काही प्रकरणांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज भासते. परंतु बहुतांश वेळा हे घरगुती उपाय नियमितपणे पाळले, तर वजन नियंत्रणात ठेवणे कठीण नसते. योग्य सवयी आणि सातत्य यामुळे शरीर निरोगी राहते तसेच मानसिक आरोग्यावरही चांगला परिणाम होतो. म्हणूनच वजन नियंत्रणासाठी महागड्या उपायांकडे धाव घेण्यापेक्षा, घरगुती सोपे आणि नैसर्गिक उपाय अवलंबणे हेच सर्वात चांगले ठरते.