1. गाईचे तूप आहारात घेतल्यास त्वचेला आतून पोषण मिळते. त्यामुळे त्वचेचा ओलावा टिकून राहतो. गाईचे तूप त्वचा कोरडी होऊ देत नाही. त्यामुळे त्वचा मुलायम आणि लवचिक राहण्यास मदत होते.
2. गाईचे तूप सेवन केल्यास चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो. तूप रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. त्यामुळे चेहरा निस्तेज न दिसता उजळ आणि तजेलदार दिसू लागतो.
advertisement
3. वय वाढल्याची चिन्हे कमी करण्यास देखील गाईचे तूप प्रभावी ठरते. सुरकुत्या आणि त्वचा शिथिल होण्याची प्रक्रिया तुपामुळे मंदावते. तुपातील पोषक घटक त्वचा घट्ट ठेवण्यास मदत करतात.
4. संवेदनशील त्वचेसाठीही तूप उपयोगी आहे. हिवाळ्यात येणारी खाज, जळजळ आणि कोरडी त्वचा या समस्या तूप आहारात घेतल्यास कमी होतात.
5. हिवाळ्यात सर्वाधिक त्रास देणारे ओठ आणि टाचांसाठी देखील गाईचे तूप उत्तम पर्याय आहे. रात्री तूप लावून झोपल्यास फुटलेले ओठ आणि टाच काही दिवसांत बरे होतात.
तूप आहारात कसं घ्यावं?
दररोज सकाळी 1 चमचा गाईचे तूप हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. दररोज 1 ते 2 चमचे तूप गरम जेवणात घेऊ शकता. भाकरी, डाळ भात यासोबत गाईचे तूप खाणे अत्यंत पौष्टिक मानले जाते. तसेच रात्री कोमट दुधात सुद्धा 1 चमचा तूप तुम्ही घेऊ शकता. मधुमेह, वजन वाढलेले किंवा कोलेस्ट्रॉल वाढलेले असणाऱ्यांनी तूप जास्त प्रमाणात सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.