काय आहेत आवळा खाण्याचे फायदे?
आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असतं. हे विटामिन सी आपल्या शरीरासाठी अत्यंत असे फायदेशीर आहे. आवळा जर आपण पावडर करून खाल्ला. त्याच्या फोडी करून खाल्ल्या किंवा त्याला उकळून खाल्ले तरीसुद्धा यात असलेल्या विटामिन सी हे कमी होत नाही. यामुळे ते आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरतं. ज्यांना ऍसिडिटी आहे अशांनी दररोज सकाळी आवळा गरम पाण्यात थोडासा किसून टाकला आणि पाणी जर पिले तर अगदी काही दिवसांमध्ये त्यांचा ऍसिडिटीचा त्रास हा नाहीसा होतो, असं अलका कर्णिक सांगतात.
advertisement
Winter Health Tips : हिवाळ्यात नक्की खा 'या' 5 भाज्या, सर्दी खोकल्यासारखे त्रास राहतील कायम दूर
ज्यांना लठ्ठा पना जास्त झालेला आहे अशांसाठी आवळा एक अत्यंत उपयुक्त आहे. शरीरावरील चरबी कमी करायला आवळा मदत करतो. आवळ्यात असलेले फायबर हे एक्स्ट्रा कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतं. ज्यांची बैठकी जीवनशैली आहे किंवा ज्यांचं वजन हे त्यांच्या उंचीपेक्षा जास्त आहे अशा सर्वांनी दररोज सकाळी आवळा हा गरम पाण्यासोबत थोडासा किसून गरम पाणी प्यावं. त्यासोबत सकाळी नाश्ता झाल्यानंतर आवळ्याला थोडीशी हळद आणि लिंबाचा रसची फोड खाली तर हे सर्व कमी व्हायला मदत होते.
हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल? 'या' टिप्स पाहा होईल फायदा
आवळा हा सर्वच रोगांवरती अत्यंत गुणकारी आहे. तो तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून घेऊ शकता. त्याचा रस घेऊ शकता त्यासोबत तुम्ही आवळ्याची स्मुदी, आवळ्याची कच्ची फोड देखील खाऊ शकता. आवळा हा सौंदर्यासाठी देखील खूप महत्त्वाचा आहे. केसांच्या वाढीसाठी चेहऱ्यासाठी आवळा अत्यंत उपयुक्त ठरतो. ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांनी दररोज आवळ्याचे सेवन हे करायलाच पाहिजे यामुळे त्यांना भरपूर फायदे होतात, असंही अलका कर्णिक सांगतात.