खजूरमधील त्वचेसाठी महत्त्वाचे असणारे घटक कोणते?
खजूर आहारात समाविष्ट केल्यास त्वचेला कोणते फायदे होतात? याबाबत माहिती देताना डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात की, खजूरमध्ये अनेक पौष्टिक घटक आहेत. विटामिन A, C, D, E, तसेच आयर्न, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स हे सर्व घटक खजूरमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. हे सर्व घटक त्वचेला पोषण देतात आणि कोरडेपणा कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे खजूर त्वचेसाठी फायदेशीर आहे.
advertisement
Mother Love: सतत ताप अन् मळमळ, लेकीला गंभीर आजार, शेवटी आईच ती, घेतला जीवावर बेतणारा निर्णय!
नियमित सेवन केल्यास चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येण्यास मदत
हिवाळ्यात वातावरणातील आर्द्रता कमी होते. त्यामुळे त्वचा कोरडी होते. खजूरमधील नॅचरल शुगर आणि पोटॅशियम शरीरातील वॉटर लेव्हल टिकवून ठेवते. यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. त्यामुळे त्वचा सतेज आणि मऊ दिसण्यास मदत होते. खजूरमधील अँटिऑक्सिडंट्स आणि विटामिन C त्वचेतून फ्री रॅडिकल्स काढून टाकतात. ज्यामुळे डेड स्किन आणि काळवटपणा कमी होतो. खजूर नियमित सेवन केल्यास चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येण्यास देखील मदत होते. खजूरमधील विटामिन D आणि प्रोटीन त्वचेच्या पेशींना ॲक्टिव्ह करतात. बारीक सुरकुत्या तसेच डाग कमी होण्यास मदत होते.
खजूर खाण्याची योग्य पद्धत कोणती?
दररोज सकाळी 3 ते 5 खजूर कोमट दुधात भिजवून खाल्ल्यास त्वचेवर चांगला परिणाम दिसतो. तसेच हिवाळ्यात खजूर, बदाम आणि तूप घालून लाडू सुद्धा बनवू शकता. तो लाडू दिवसाला एक आहारात घेतल्याने देखील त्वचा सतेज राहण्यास मदत होईल. अति प्रमाणात खजूर सेवन करू नये. त्यामुळे शुगर लेव्हल वाढण्याचा धोका असतो. दिवसाला 3 ते 5 खजूर पुरेसे आहेत, अशी माहिती डॉ. टाकरखेडे यांनी दिली.