हिवाळ्यात मेथीचे लाडू खाण्याचे फायदे पुढीलप्रमाणे
हिवाळ्यात मेथीचे लाडू आहारात घेतल्यास हाडे आणि सांधे मजबूत होतात. मेथीमध्ये कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असल्याने संधिवात, पाठदुखी, गुडघेदुखी यांसारख्या समस्यांना आराम मिळतो. तसेच शरीराला उष्णता मिळते. हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी मेथीचे लाडू उत्तम आहेत. हे शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. तसेच थंडीमुळे होणारा त्रासही कमी करण्यास मदत होते.
advertisement
Corn Tikki Recipe : फराळ खाऊन कंटाळा आलाय? झटपट बनवा स्वादिष्ट कॉर्न टिक्की, रेसिपीचा Video
अन्न पचण्यासही मदत होते
त्याचबरोबर हिवाळ्यात जर आपल्या आहारात मेथीचे लाडू असेल तर पचन सुधारण्यास देखील मदत होते. मेथीमध्ये फायबर असल्याने बद्धकोष्ठता कमी होते. अन्न पचण्यास मदत होते आणि पोट हलके राहते. प्रसूतीनंतर महिलांसाठी देखील मेथीचे लाडू फायदेशीर आहेत. प्रसूतीनंतर शरीरातील थकवा, कमजोरी दूर करण्यासाठी हे लाडू उपयुक्त आहेत. स्नायूंना बळकटी देतात आणि ऊर्जा वाढवतात.
त्वचा आणि केसांसाठी देखील उपयुक्त
तसेच साखरेवर नियंत्रण ठेवतात. मेथीचे दाणे रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांसाठी हे लाडू काही प्रमाणात फायदेशीर ठरतात. थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी देखील मेथीचे लाडू फायदेशीर ठरतात. गूळ, तूप आणि सुकामेवा यामुळे शरीराला आवश्यक कॅलरी व ताकद मिळते. त्यामुळे दिवसभर उत्साही वाटते. त्वचा आणि केसांचे आरोग्य देखील सुधारते. मेथीतील अँटिऑक्सिडंट्स त्वचा तजेलदार ठेवतात आणि केस गळती कमी करतात.
मेथीचे लाडू खाताना काय काळजी घ्यावी?
हिवाळ्यात रोज 1 ते 2 लाडू पुरेसे असतात. जास्त खाल्ल्यास शरीरात उष्णता वाढण्याची शक्यता असते. मधुमेह किंवा उष्ण प्रकृती असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सेवन करावे. तसेच लाडू बनवताना त्यातील साहित्य देखील आपल्या आरोग्याच्या अनुसरूनच घ्यावे.





