त्वचारोग तज्ज्ञ सांगतात की, पेरूमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण संत्र्यांपेक्षाही अधिक असते. हे व्हिटॅमिन त्वचेत कोलॅजन तयार करण्यास मदत करतं. कोलॅजनमुळे त्वचेची लवचिकता आणि टवटवी टिकून राहते. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते, फाटते आणि निस्तेज दिसते, अशा वेळी पेरूचे नियमित सेवन त्वचेला आतून हायड्रेशन पुरवतं. त्यामुळे कोरडेपणाची समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होते.
advertisement
सकाळच्या नाश्त्याचं टेन्शन सोडा, घरीच बनवा स्वादिष्ट ब्रेड रोल्स, रेसिपीचा Video
पेरूमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि लाइकोपीन त्वचेचं वृद्धत्व रोखण्यास मदत करतात. हे घटक फ्री रॅडिकल्सशी लढा देऊन सुरकुत्या आणि डाग कमी करतात. काही सौंदर्यतज्ज्ञांच्या मते, पेरूचा रस किंवा त्याचा फेसपॅक लावल्याने त्वचेतील मृत पेशी दूर होतात आणि त्वचा अधिक उजळ आणि तजेलदार दिसते. त्यामुळे पेरू केवळ आहारात नव्हे तर बाह्य सौंदर्यदेखील टिकवून ठेवण्यास उपयोगी ठरतो.
याशिवाय, पेरूमध्ये असलेले नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेवरील संक्रमण, पिंपल्स आणि ब्लॅकहेड्सपासून संरक्षण करतात. हिवाळ्यात अनेकांना कोरडी किंवा तेलकट त्वचा यामुळे त्रास होतो. पेरूचे नियमित सेवन केल्यास त्वचेचा पीएच संतुलित राहतो आणि अशा समस्यांपासून आराम मिळतो. त्यामुळे हिवाळ्यात दररोज एक पेरू खाण्याचा सल्ला अनेक आरोग्य तज्ज्ञ देतात.
सौंदर्य आणि आरोग्य दोन्ही जपणारा हा साधा पण प्रभावी फळांचा राजा हिवाळ्यातील आहारात नक्कीच असावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पेरू त्वचेला आतून चमक देतो, तिला थंडीच्या परिणामांपासून वाचवतो आणि नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवतो. त्यामुळे हिवाळ्यात महागड्या क्रीम्सऐवजी पेरूचा आस्वाद घ्या आणि निरोगी, तेजस्वी त्वचा मिळवा असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.





