TRENDING:

Health Tips : हिवाळ्यात वाढेल रोगप्रतिकारशक्ती, आहारात समावेश करा सुरण कंद, आणखी हे फायदे पाहाच

Last Updated:

हिवाळ्यात शरीराला ऊब देणारे पदार्थ आहारात जास्त घेतले जातात. सुरण कंददेखील त्यातीलच एक आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती: अनेक भागांत सुरण कंदाची शेती केली जाते. त्यानंतर हिवाळ्यात कंद मोठे होतात आणि बाजारात विक्रीसाठी येतात. बहुगुणी सुरण कंदाला बाजारात भरपूर मागणी असते. कारण हिवाळ्यात शरीराला ऊब देणारे पदार्थ आहारात जास्त घेतले जातात. सुरण कंददेखील त्यातीलच एक आहे. सुरण हे उष्ण, पौष्टिक आणि उपचारात्मक गुणधर्मांनी परिपूर्ण असून हिवाळ्यात याचे सेवन विशेष लाभदायक ठरते. तसेच काही रुग्णांसाठी तो हानिकारक देखील आहे. हिवाळ्यात सुरण कंद खाण्याचे फायदे आणि तोटे कोणते आहेत? याबाबत माहिती जाणून घेऊ.
advertisement

हिवाळ्यात सुरणाचे सेवन मुबलक प्रमाणात केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. सुरणात व्हिटामिन C, अँटिऑक्सिडंट आणि खनिजे मुबलक प्रमाणात असल्याने सर्दी-खोकला आणि हिवाळ्यात होणाऱ्या संसर्गापासून बचाव करण्यास मदत होते. सुरणामुळे पचन सुधारते, गॅस आणि अपचनावरही फायदा होतो. सुरणातील फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवते. बद्धकोष्ठता, गॅस, आम्लपित्त अशा समस्यांवर सुरण उपयुक्त असल्याचे आहारतज्ज्ञ सांगतात.

Success Story : आजारपणात सुचली आयडिया, दाम्पत्याने सुरू केला फ्रूट प्लेट व्यवसाय, महिन्याला 80 हजार कमाई

advertisement

हिवाळ्यात अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतो. त्यावरही सुरण फायदेशीर आहे. हिवाळ्यात वाढणाऱ्या सांधेदुखी, स्नायू ताण आणि सूज यावर सुरण आराम देतो. सुरणात आयर्न असल्याने रक्ताची पातळी वाढविण्यास उपयोगी ठरतो. थकवा आणि अशक्तपणा कमी करण्यास मदत होते. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढविण्यासही मदत होते. फायबरमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते. वारंवार भूक लागत नाही, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही सुरण फायदेशीर आहे. सुरणात व्हिटामिन A आणि C असल्याने त्वचेला ओलावा मिळतो. कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. तसेच केस गळती आणि कोंड्यावरही फायदा होतो असे तज्ज्ञ सांगतात.

advertisement

सुरणाचा समावेश आहारात करण्याची योग्य पद्धत कोणती?

सुरणाची रस्सा भाजी पचनासाठी योग्य आहे. त्यामुळे तुम्ही त्याची भाजी बनवून सुद्धा सेवन करू शकता. तसेच अनेकजण तुपात भाजलेला सुरण खातात. त्यामुळे शरीराला ऊब मिळते.

सुरण आहारात घेताना काय काळजी घ्यावी?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात वाढेल रोगप्रतिकारशक्ती, आहारात समावेश करा सुरण कंद, आणखी हे फायदे पाहा
सर्व पहा

कच्चे सुरण खाऊ नये. त्यामुळे घसा खवखवल्यासारखा होऊ शकतो. तसेच जिभही जड होते. मूळव्याध आणि पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी कमी प्रमाणात सेवन करावे. किंवा सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सुरणाचे काप करताना हाताला तेल लावूनच काप करावे. शिजवताना हळद, चिंच किंवा लिंबू घातल्यास खाज येत नाही. हिवाळ्यात शरीराला ऊब देणारा, प्रतिकारशक्ती वाढवणारा आणि सर्वांगीण आरोग्याला पोषक असा सुरण कंद हिवाळ्यात 2 ते 3 वेळा आहारात घेऊ शकता. त्याचे अति सेवनही शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : हिवाळ्यात वाढेल रोगप्रतिकारशक्ती, आहारात समावेश करा सुरण कंद, आणखी हे फायदे पाहाच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल