वर्धा : कांस्य थाळी थेरेपी ही एक प्रभावी उपचारपद्धती आहे. कांस्यच्या धातूने पायांना मसाज केला जातो. त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते असे सांगितले जाते. कांस्य हा मिश्र धातू तांबे आणि जस्तमिश्रित असतो. त्यापासून तयार केलेल्या वाटीने पायाला मसाज केल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. सोन्यापेक्षा स्वस्त आणि सामान्यांच्या आवाक्यात असलेल्या कांस्य या धातूपासून कांस्याची वाटी बनवली जाते. शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता आणि वात कमी करण्यासाठी कांस्याची वाटी प्रभावी ठरते. जुन्या काळापासून ही एक उपचारपद्धती प्रभावी मानली गेली आहे. आज या थेरेपीचं स्वरूप मशीनमध्ये बघायला मिळत आहे. ही थेरेपी नेमकी कशी दिली जाते? या थेरेपीचे शरीराला काय फायदे आहेत? यासंदर्भात वर्धा येथील कांस्य थाळी थेरेपिस्ट अभिषेक मांजरखेडे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
या थेरेपीचे शरीरासाठी अनेक फायदे
कांस्य थाळी थेरेपी ही आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली आहे. पूर्वीच्या काळात कांस्याच्या वाटीवर तेल लावून किंवा तूप लावून पायावर मसाज केला जायचा. हीच पद्धत सध्या मशीनच्या स्वरूपातही बघायला मिळते. या थेरेपीचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. 100 पेक्षा जास्त फायदे या थेरेपीचे आपल्या शरीरासाठी होतात. आपल्या शरीरातील विषारी घटक या थेरेपी मुळे बाहेर पडण्यास मदत होते.
शुगर आणि पोटाच्या विकारांवर रामबाण उपाय, काश्मिरी संत्री आता महाराष्ट्रात
या आजारांपासून होईल सुटका
अनेक रुग्णांना या थेरेपीमुळे आराम मिळालेला आहे. जसे की पोटाचे आजार, वात, रक्तदाब, शुगर, अस्थमा, दमा, यासारख्या रुग्णांना कांस्य थाळी थेरेपीमुळे आराम मिळालेला आहे. रोज दहा मिनिटे या थाळीवर थेरेपी दिल्याने रुग्णाला बरे वाटू लागते. त्यामुळे अनेक लोक या थेरेपीकडे वळताना दिसत आहेत. आपल्या शरीरातली प्रक्रिया चांगली सुरू राहण्यासाठी रक्तभिसरण बरोबर असणे ही गरजेचे असते आणि यात थेरेपीमुळे रक्तभिसरण प्रक्रिया सुधारते त्यामुळे ही थेरपी रुग्णासाठी खूप फायद्याची ठरत आहे,अशी माहिती थेरेपिस्ट अभिषेक मांजरखेडे यांनी दिली.