TRENDING:

हिवाळ्यात ओठांना कलरवाली लिपबाम लावत असाल तर थांबा, डॉक्टरांनी काय सांगितलं ऐका! VIDEO

Last Updated:

हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्वचा कोरडी झाली की, सर्वात जास्त त्रास होतो तो म्हणजे ओठांना. ओठ कोरडे झाले की जेवण करण्यास त्रास होतो. आणखी बऱ्याच समस्या उद्भवतात. त्यावेळी अनेक जण कलर असणाऱ्या लीप बाम  वापरतात. कलर असणाऱ्या लीपबाम ओठांसाठी हानिकारक असतात. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
advertisement

अमरावती : हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्वचा कोरडी झाली की, सर्वात जास्त त्रास होतो तो म्हणजे ओठांना. ओठ कोरडे झाले की जेवण करण्यास त्रास होतो. आणखी बऱ्याच समस्या उद्भवतात. त्यावेळी अनेक जण कलर असणाऱ्या लिपबाम वापरतात. वेगवेगळे प्रॉडक्ट सुद्धा वापरून बघतात. कलर असणाऱ्या लिपबाम ओठांसाठी हानिकारक असतात. पण ते सहज लक्षात येत नाहीत. हिवाळ्यात कलर असणाऱ्या लिपबाम ओठांना लावल्यास काय होऊ शकते? याबाबत त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी माहिती दिली आहे.

advertisement

हिवाळ्यात कलर लिपबाम ओठांना लावल्यास काय होऊ शकते? 

हिवाळ्यात ओठ कोरडे झाले की त्यावर ग्लिसरीन आणि लिपबाम लावणे हाच उपाय अनेकांना दिसतो. सर्वात जास्त मुली ओठांना कलर असणाऱ्या लिपबाम लावतात. कमी किमतीच्या लिपबाम खरेदी केल्यास त्यात केमिकल असतात. ज्यामुळे ओठांना हानी पोहचते. त्यामुळे ओठ काळे दिसायला लागतात आणि आणखी कोरडे होतात. ही हळूहळू होणारी प्रोसेस आहे, आपल्या लगेच लक्षात येत नाही. काही दिवसानंतर आपल्याला हा बदल जाणवतो. त्यामुळे ग्लिसरीन आणि कलर असणारी लिपबाम ओठांना लावणे टाळले पाहिजे, असं डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी सांगितलं.

advertisement

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडतेय? लिंबू, गुलाबजल वापरावं का? डॉक्टरांचा सल्ला

हिवाळ्यात ओठांची काळजी घेताना व्हॅसलिन आणि घरगुती गाईचे तूप वापरावे. ज्यामुळे तुमच्या ओठांना हानी पोहोचणार नाही आणि ओठ चांगले राहतील. त्याचबरोबर ओठांची काळजी घेताना त्यावर मळ साचू देऊ नये हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. काही वेळा आपण बाहेर फिरतो आणि ओठावर व्हॅसलिन किंवा लिपबाम लावली असल्याने धूळ त्यावर येऊन बसते. असे होणार नाही याबाबत सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यात सुरू केली फूड स्कॉलरशिप, कुलदीप यांचे काम पाहून तुम्हीही कराल कौतुक!
सर्व पहा

सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
हिवाळ्यात ओठांना कलरवाली लिपबाम लावत असाल तर थांबा, डॉक्टरांनी काय सांगितलं ऐका! VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल