हिवाळ्यात त्वचा कोरडी पडतेय? लिंबू, गुलाबजल वापरावं का? डॉक्टरांचा सल्ला
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Winter Skin Care: हिवाळ्यातील कडक्याच्या थंडीमुळे अनेकांना त्वचा विकारांचा सामना करावा लागतो. या काळात त्वचेची काळजी कशी घ्यावी? याबाबत त्वचारोग तज्ज्ञांकडून जाणून घेऊ.
advertisement
advertisement
डॉ टाकरखेडे सांगतात की, “हिवाळ्यात त्वचा कोरडी होते आणि त्याला खाज सुटते. त्यामुळे त्वचेला मॉइश्चराईज ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. हिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना आपली त्वचा नेमकी कोणत्या प्रकारात मोडते? हे जाणून घेणे महत्वाचे आहे. तुमची त्वचा जर तेलकट असेल तर त्यावर वॉटर बेस म्हणजेच एलोवेरासारखे मॉइश्चरायजर लावावे.”
advertisement
advertisement
advertisement
advertisement
घरगुती उपाय करतांना त्वचेला लिंबू, ग्लिसरीन, गुलाब जल लावू नये. यामुळे त्वचेला इजा पोहचते. ग्लिसरीन लावल्याने त्वचा काळी पडते. लिंबामुळे त्वचेला खाज सुटते. काही वेळा हलक्या प्रॉडक्टचा वापर केल्याने त्वचा लालसर होते. त्यामुळे घरगुती उपाय करतांना काळजी घेणे आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट करतांना डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. (प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी)